औरंगाबादः ‘शिवसेनाप्रमुखांनी २५ वर्षांपूर्वी शहराचे नामांतर केलं आहे. तेव्हा पासून आम्ही संभाजीनगरच म्हणतो आणि मुख्यमंत्र्यांचीही तीव्र इच्छा आहे. लवकरच महाविकास आघाडी सरकार प्रस्ताव मंजुर करेल अशी माझी खात्री आहे,’ असे संकेत शिवसेना नेते यांनी दिले आहेत. त्यामुळं लवकरच औरंगाबाद नामांतराचा तिढा सुटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या शहराच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे रेटण्यात आला आहे. शिवसेना या नामांतरासाठी आग्रही असून त्यावर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र यातून मध्यम मार्ग काढला जाईल असे म्हणत सावध भूमिका घेतली आहे. या सगळ्या वादावर आता सुभाष देसाई यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

‘औरंगजेब तुमचा कोण असा खणखणती प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. आपण संभाजी महाराजांचा अभिमान बाळगला पाहिजे,’ असंही देसाई यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेच्या सुपर संभाजीनगर या मोहिमेविरुद्ध भाजपननं नमस्ते संभाजीचे पोस्टर झळाकावले होते. यासगळ्यावर देसाई यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ‘सर्व नागरिकांनी संभाजी नगर म्हटले पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. १५ लाख नागरिकांनी संभाजी नगर म्हटलं पाहिजे. आपलं संभाजीनगर म्हणा, सुपर संभाजी नगर म्हणा, स्मार्ट संभाजीनगर म्हणा किंवा नमस्ते संभाजीनगर म्हणा आम्हाला काही फरक पडत नाही. हे लोण पसरत पसरत ज्या दिवशी सर्वच्या सर्व नागरिक हे माझं संभाजीनगर आहे आणि अभिामन वाटेल असं शहर तयार होत आहे,असं म्हणतील याच्यासारखा सुखाला क्षण नाही,’ असं देसाई यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्वीटर हँडलवर औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर असा उल्लेख वारंवार केला जात असल्याने आघाडीत बिघाडीची शक्यता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच सीएमओच्या ट्विटर हँडलवर उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव असा केला होता. त्यामुळं नामांतरासाठी शिवसेनादेखील आक्रमक झाली असल्याची चर्चा आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here