‘आयपीओ’मध्ये कंपनीकडून सरासरी ३०० कोटींचे इक्विटी शेअर्सचा ताजा इश्यू समाविष्ट असेल आणि सेक्वोइआ कॅपिटल इंडिया इन्व्हेस्टमेंट्स IV आणि एससीआय इन्व्हेस्टमेंट्स V आणि प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर, हेमंत जालन (प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर) तसेच एकत्रित गुंतवणुकदार विक्रेता शेअरहोल्डर, “सेलिंग शेअरहोल्डर”द्वारा ५,८४०,००० पर्यंतच्या इक्विटी शेअर्स विक्रीचा प्रस्ताव असेल आणि इक्विटी शेअरचा हा प्रस्ताव विक्रेता शेअरहोल्डरकडून ठेवण्यात येईल, ऑफर फॉर सेलिंग या प्रस्तावात कंपनीच्या पात्र कर्मचाऱ्यांकडून ७०,००० इक्विटी शेअरचे आरक्षण (“कर्मचारी आरक्षण भाग”) समाविष्ट आहे. बीआरएलएमच्या सल्ल्यानुसार कंपनी आणि विक्रेता शेअर होल्डर पात्र कर्मचाऱ्यांना कर्मचारी आरक्षण भागात प्रती शेअर १४८ रुपयांची सूट देण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटलं आहे.
सेबी आयसीडीआर नियमनानुसार, विना-संस्थात्मक बोलीकर्ते (नॉन इन्स्टीट्युशनल बीडर्स)’ना १५ टक्केपेक्षा जास्त रकमेचे वाटप करता येणार नाही आणि इश्यूच्या ३५ टक्क्यांहून अधिकचे वाटप वैयक्तिक रिटेल बोलीकर्ते (रिटेल इंडीविज्युअल बीडर्स)ना करता येणार नाही. त्याशिवाय इक्विटी सेअर हे कर्मचारी आरक्षण भागातंर्गत अर्ज करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांच्या गुणोत्तराच्या आधारावर राहील, हा व्यवहार त्यांच्या अधीन असलेल्या वैध बोलीच्या किंवा प्रस्ताव किमतीच्यावर असेल,असे कंपनीने म्हटलं आहे.
आयपीओतून उभा राहिलेल्या निधीतील १५० कोटी रुपये निधी तामिळनाडू येथील पुदुक्कोट्टाई येथील निर्मिती सुविधा केंद्राच्या जवळच्या भागात अतिरिक्त निर्मिती सुविधा केंद्र उभारणीकरिता वापरण्यात येईल. त्याशिवाय ५० कोटी मशीन खरेदीसाठी आणि २५ कोटी कर्जांची परतफेड करण्यांसाठी केला जाईल, असे कंपनीचे नियोजन आहे. आर्थिक वर्ष २० करिता उत्पन्नाच्या बाबतीत सजावटीच्या रंग उद्योगातील भारतातील पाचव्या क्रमांकाची कंपनी आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times