जालनाः देशात आणि राज्यात आज करोना लसीकरणाचा शुभारंभ झाला. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानंतर आता राज्यातील सर्वसामान्यांना लस कधी मिळणार असा सवाल उपस्थित होत आहे. यासर्वांवर राज्याचे आरोग्यमंत्री यांनी उत्तर दिली आहेत

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात येणार आहे. त्यात प्राधान्यक्रमानुसार, रुग्णवाहिका चालक, परिचारिका, डॉक्टर, वॉर्डबॉय यांना लस देण्यात आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात स्वच्छता कर्मचारी, जेष्ठ नागरिक आणि नंतर सर्वसामान्यांना लस दिली जाईल, असं आश्वासन राजेश टोपे यांनी दिलं आहे.

पहिल्या टप्प्यात राज्यासाठी १७. ५० लाख डोस आवश्यक होते. मात्र, आजवर ९. ८० लाख डोस प्राप्त झाले आहेत. उर्वरित डोस लवकर उपलब्ध होतील, असं टोपे म्हणाले आहे. शिवाय, दारिद्रय रेषेखालील सर्वांना मोफत लस मिळावी यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्यातील सर्व गरजूंना लस मिळेल, कोणालाही राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

आपण प्रत्येकजण कोरोना प्रतिबंधक लसीची वाट पाहत होतो. आता लसीकरणास सुरुवात झाली आहे. ही लस सुरक्षित होती आणि आहे. याबाबतीत आम्ही यापूर्वीही सांगितलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा हाच संदेश दिलाय. कोव्हिड योद्ध्यांनी आपल्या सर्वांचे प्राण वाचवले. ११ महिने त्यांनी जीव धोक्यात घालून मेहनत केली. त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांना आधी लस दिली, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here