ब्रिस्बेन, : चौथ्या कसोटी सामन्यात बाद झाल्यावर रोहित शर्मावर भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी कडाडून टीका केली होती. पण आता गावस्कर यांच्या टीकेला रोहितने प्रत्युत्तर दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

गावस्कर यांनी रोहितवर काय टीका केली होती, पाहा…रोहितवर टीका करताना गावस्कर यावेळी म्हणाले होते की, ” रोहित शर्मा जो फटका मारुन बाद झाला त्यावर विश्वास बसत नाही. कारण रोहितने बेजबाबदारपणे हा फटका मारला. लॉंग ऑनला ऑस्ट्रेलियाचा खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी उभा होता, हे सर्वांनाच माहिती होते. पण तरीही रोहितने फटका मारला आणि तो बाद झाला. रोहितला हा फटका मारण्याची काहीच गरज नव्हती. रोहितने गरज नसताना हा फटका मारला आणि त्याने आपली विकेट गमावली.”

गावस्कर पुढे म्हणाले की, ” रोहित हा संघातील एक वरिष्ठ खेळाडू आहे, त्यामुळे तो ज्यापद्धतीने बाद झाला हे त्याला शोभत नाही. दोन चेंडूंपूर्वीच रोहितने चौकार वसूल केला होता. त्यामुळे या चेंडूवर मोठा फटका मारण्याची रोहितला कोणतीच गरज नव्हती. माझ्यामते ही बेजबाबदारपणे केलेली फलंदाजी आहे. रोहितने आपली विकेट ऑस्ट्रेलियाला भेट म्हणून दिली. रोहितला हा फटका मारण्याची कोणतीही गरज नव्हती.”

रोहित शर्माने गावस्कर यांच्या टीकेनंतर नेमकं काय म्हटलं आहे, पाहा…
गावस्कर यांच्या टीकेनंतर रोहितने म्हटले की, ” जिथे फटका मारायला पोहोचायचे होते तिथे मी खेळपट्टीवर पोहोचलो होतो. पण त्यावेळी चेंडू आणि बॅट यांचा योग्य समन्वय झाला नाही. मला चेंडू लाँग ऑन आणि डीप स्क्वेअर लेगच्या मध्ये मारायचा होता. तो मारण्याचा प्रयत्न करायला मी गेलो होतो. पण त्यावेळी चेंडू बॅटवर योग्यरीतीने आला नाही. पण मी जी फलंदाजी केली ती चांगली होती. खेळपट्टी ही फलंदाजी करण्यासाठी चांगली आहे, चांगला बाऊन्सही आहे. त्यामुळे मी आजच्या फलंदाजीचा चांगलाच आनंद लुटला. मी जो फटका खेळून बाद झालो, त्याचे मला वाईट वाटत नाही.”

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here