म. टा. प्रतिनिधी, जळगाव: महिला अत्याचाराच्या कथित प्रकरणात अडचणीत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी शिवसेना नेते मंत्री गुलाबराव पाटील पुढे सरसावले आहेत. ‘धनंजय मुंडेंनी जाहीरपणे आपल्या दुसऱ्या कुटुंबाची कबुली दिल्यनातंरही विरोधकांकडून या प्रकरणी राजकारण केले जात आहे. मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा मागण्याचा कुणालाही अधिकार नाही’, अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी मुंडे यांचे समर्थन केले आहे.

जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोविड लसीकरणाला गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. गुलाबराव पाटील यांनी यावेळी मुंडेंच्या प्रकरणाबाबत आपले मत मांडताना विरोधकांना खडे बोल सुनावतच मुंडे यांचे समर्थन केले.

‘धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाची स्वत: कबुली दिली आहे. त्यांची कायदेशीर लढाई सुरू आहे. परंतु विरोधकांकडून याप्रश्नी उगाच राजकारण केले जात आहे. त्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार कोणालाही नाही. धनंजय मुंडे हे निर्दोष आहेत, असे मला वाटते. ते आपले निर्दोषत्व लवकरच सिद्ध करतील,’ असा विश्वास देखील गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

‘एखादा माणूस कबुली देत असेल तरीही तुम्ही त्याला चोर ठरवणार काय? त्यांना काही लपवायचे असते तर त्यांनी जाहीरपणे कबुली दिलीच नसती. अशा पद्धतीने राजकारण करून एखाद्याची ३० वर्षांची तपश्चर्या उद्ध्वस्त करू,’ असे जर कुणाला वाटत असेल तर ते चुकीचे असल्याचे गुलाबराव पाटील यांनी विरोधकांनी सुनावले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here