नवी मुंबई: देशातील विविध राज्यामध्ये बर्ड फ्लूने () टकटक दिलेली असताना नवी मुंबईतील सीवुड्स परिसरात कावळे आणि कबुतरे मृतावस्थेत आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी ही बाब संबंधित महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थली धाव घेत मृत कावळे आणि कबुतरांच्या तपासणीची प्रक्रिया सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यातही १४ पक्षी मृतावस्थेत आढळले होते. (birds found dead in the area of )

नेरुळ पश्चिम भागातील सीवुड्स येथील सेक्टर ४८ अमधील राजगड वसाहतीत आज सकाळी एक कबुतर मृतावस्थेत आढळले. त्यानंतर तातडीने महापालिकेच्या संबंधित विभागाला याची माहिती देण्यात आली. राजगड वसाहतीच्या बाजूला असलेल्या निसर्ग वसाहतीत आणि नवे घरकुल या वसाहतीत देखील कावळे मरून पडलेले आढळले. माहिती मिळताच महापालिकेच्या संबंधित विभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी घाव घेत मृतावस्थेतील कबुतर आणि कावळे ताब्यात घेऊन ती तपासणीसाठी नेल्याचे राजगड वसाहतीत राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि मनसेचे शाखा अध्यक्ष यशवंत खिलारे यांनी माहिती देताना सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-

ठाण्यातही आढळले १५

गेल्या आठवड्यात ठाण्यातील घोडबंदर रोड येथील विजय गार्डन वसाहतीत १४ पक्षी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली होती. मॉर्निग वॉकला येणाऱ्या नागरिकांना हे पक्षी मृतावस्थेत दिसले. एकाचवेळी इतके पक्षी मृतावस्थेत आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पक्षांचा मृत्यू बर्ड फ्लूची लागण झाल्याने झाला असावा का अशी शंका नागरिकांच्या मनात आहे. दरम्यान या पक्षांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाला किंवा कसे याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here