मुंबई: देशासह राज्यभरात करोनावर मात करण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली असून आज लसीकरणाच्या पहिल्या दिवशी करोनाबाबत दिलासादायक वृत्त हाती आहे आहे. त्यानुसार आज दिवसभरात वाढलेल्या नव्या रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. राज्यात आज दिवसभरात एकूण ३ हजार ३९ इतक्या रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तर दिवसभरात राज्यात एकूण २ हजार ९१० नवे रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत एकूण करोनाबाधितांपैकी १८ लाख ८४ हजार १२७ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.
राज्यात एकूण ५१ हजार ९५६ सक्रिय रुग्ण, अर्थात ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे रुग्ण आहेत. मुंबईचा विचार करता मंबईत एकूण ६९६६ इतक्या रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत एकूण २८३१३५ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत एकूण ११२३७ रुग्णांचा मृत्यु झाला आहे, तर एकूण ८८८ रुग्णांचा इतर कारणांमुळे मृत्यु झाला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times