मुंबई: खूनप्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करून निराधार कुटुंबाला मदत करा या मागणी करणारे खुले पत्र पीडित मातेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री बंगल्यापासून जवळच्या अंतरावर सांताक्रुझ पूर्व येथे आकाश जाधव या तरुणाचा वस्तीतील गुंडांनी जातीवाचक शिवीगाळ करत हल्ला केला. तसेच जाधव यांच्या घरातील नळाचे पाणीही बंद केले. याबाबत तक्रार दिली असता पोलिसांनी ती अॅट्रोसिटी कायद्याखाली नोंदवली नाही, अशी तक्रार करताना राजकीय दबावामुळेच असे केले गेले असा स्पष्ट आरोप पीडित माता सुप्रिया जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या खुल्या पत्रात केला आहे. दरम्यान, पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी विविध सामाजिक संघटना १८ जानेवारीला वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध धरणे आंदोलन करणार आहेत.

या हल्ल्याबाबत आपण वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी आमची तक्रार नोंदवून न घेता आम्हाला हाकलून दिले, असे पीडित मातेने पत्रात म्हटले आहे. हल्ल्यानंतर आकाशची तब्येत बिघडल्यानंतर त्याला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथूनही पोलिसांना ई-मेलद्वारे कळवण्यात आले. मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही. नंतर आकाशची तब्येत अधिक बिघडल्यानंतर त्याचे पोटाचे ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. असे असले तरी आम्ही सांगितलेली आरोपींची नावे पोलिसांनी नोंदवली नाहीत. तसेच जातीवाचक शिवीगाळ, धक्काबुक्की करणे हे प्रकारही एफआयआरमध्ये नोंद न करता अगदीच किरकोळ कलमे घालण्यात आली. आरोपींना अॅट्रोसिटी कायदा लावला नाही आणि सर्वांना जामिनावर सोडण्यात आले. आकाशचे ४ डिसेंबर या दिवशी कुपर रुग्णालयात मृत्यू झाला, असे पीडित मातेने पत्रात म्हटले आहे.

संबंधित आरोपी सत्ताधारी पक्षाशी संबंधित- पीडित मातेचा आरोप
या प्रकरणातील सर्व प्रमुख आरोपींवर जीवघेण्या मारहाणीची आणि जातीवाचक अन्यायाची कठोर कलमे लावण्यास संबंधित पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी नकार दिला, कारण संबंधित आरोपी हे सत्ताधारी पक्षाशी संबंधित परिवहन मंत्री आणि माजी महापौर यांच्याशी संबंधित असल्याचे पीडित मातेचे म्हणणे आहे. त्यांच्या राजकीय दबावामुळे पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ आणि हलगर्जीपणा करत आरोपींना अप्रत्यक्षपणे वाचवण्याचा प्रयत्न केला असे आपले स्पष्ट मत असल्याचे पीडित माता सुप्रिया जाधव यांचे म्हणणे आहे.

क्लिक करा आणि वाचा-

साहित्यिक, समाजिक कार्यकर्त्यांनी कारवाईची केली मागणी
मारहाणीचा बळी ठरलेला आकाश जाधव याची माता सुप्रिया जाधव यांच्या निवेदनाशी आम्ही सहमत असून आरोपींना तत्काळ अटक करून पीडित कुटुंबाला शासनाने मदत करावी अशी मागणी साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. यात साहित्यिक उर्मिला पवार, प्रतिमा जोशी, डॉ. माया पंडित, डॉ. प्रज्ञा दया पवार, डॉ. कुंदा प्र. नी. डॉ. वंदना महाजन, छाया कोरेगावकर, कविता मोरवणकर, डॉ. छाया दातार, ज्योती म्हापसेकर, हिरा बनसोड, सुबोध मोरे, डॉ. रमेश कांबळे, सुमेध जाधव आदींचा समावेश आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here