नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशात लसीकरण मोहिमेच्या ( vaccination ) पहिल्या टप्प्याची सुरवात केली. पहिल्या टप्प्यात, लसीचा पहिला डोस देशातील आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येत. केंद्र सरकारने ऑक्सफोर्ड अ‍ॅस्ट्रॅझेनेकाच्या ‘कोविशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’ या दोन लसींद्वारे लसीकरण मोहीम सुरू केली आहे. लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यातील पहिला दिवस यशस्वी ( ) ठरल्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ( ) दिलीय.

पहिल्या दिवशी १,९१,१८१ जणांना लस

लसीकरण मोहिमेचा पहिला दिवस यशस्वी झाला. लसीकरणानंतर आतापर्यंत रुग्णालयात दाखल होण्याचं एकही प्रकरण समोर आलेलं नाही. करोना व्हायरसवर मात करण्यासाठी सरकारने पहिले पाऊल उचलले आहे. त्याअंतर्गत देशभरातील आरोग्य केंद्रांवर लसीकरण सुरू झाले आहे. आरोग्य शनिवारी संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत देशभरातील १,९१,१८१ जणांना करोनावरील लस दिली गेली, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलीय.

पहिल्या दिवशी ३३५१ केंद्रात लसीकरण

पहिल्या दिवशी ३३५१ केंद्रात लसीकरण झाले. या मोहिमेमध्ये दोन्ही लसी वापरल्या जात आहेत. ‘कोवशिल्ड’चा पुरवठा सर्व राज्यांत झाला आहे, तर ‘कोवॅक्सिन’ फक्त १२ राज्यांत पाठवण्यात आली आहे. लसीकरणाचा पहिला दिवस असल्याने काही समस्याही उद्भवल्या. लाभार्थ्यांची यादी काही ठिकाणी अपलोड करण्यास विलंब झाला. पहिल्याच दिवशी देशभरातील एकूण १६,७५५ कर्मचा्ऱ्यांनी मोहीमेत मदत केली.

दिग्गजांनी घेतली लस

लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी आरोग्य व्यावसायिकांनीही लस घेतली. त्यात सीरम इन्सिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला, दिल्लीतील एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया, मेदांता रुग्णालयाचे अध्यक्ष नरेश त्रेहन, भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे (MCI) माजी अध्यक्ष डॉ. केतन देसाई आणि भाजपचे खासदार महेश शर्मा यांचा समावेश होता. कोविड लस पूर्णपणे सुरक्षित आहे आणि अफवा टाळण्याचा सल्ला या सर्वांनी दिला. महेश शर्मा यांनी एक डॉक्टर म्हणून ही लस घेतली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here