गोंदिया वगळता राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील तापमान १० अंशांहून अधिक असले तरीसुद्धा संपूर्ण राज्यात जाणवू लागली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच शहरातील ढगाळ वातावरणाने निरोप घेतला. वातावरण कोरडे झाले आणि पाऱ्यात घसरण झाली. गोंदिया खालोखाल ब्रह्मपुरी येथे १२.२ आणि १२.६ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. मध्यंतरी कपाटात गेलेले स्वेटर्स, मफलर आता बाहेर निघालेत. पुढील काही दिवस वातावरण कोरडे राहणार असून थंडीही कायम राहणार आहे. केवळ २० जानेवारी रोजी विदर्भात किंचित ढगाळ वातावरणाची शक्यता असल्याने त्या दिवशी तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
मुंबईत जाणवतोय गारवा
दिल्लीसह उत्तरेकडील राज्यांमध्ये पारा खूपच खाली घसरला असल्याने आता राज्यातही अनेक भागांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्र, विदर्भ कोकणात थंडी चांगलीच जाणवणार आहे. याबरोबरच २२ आणि २३ जानेवारीनंतर पुणे आणि नाशिकचे तापमान १२ अंश सेल्सिअसच्या खाली घसरण्याची शक्यता आहे. मुंबई आणि परिसरातील तापमान १६ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून गारवा जाणवू लागला आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times