मुंबई: कोविड १९ लसीकरणासाठी ऑफलाइन नोंदणी करू नये व मार्फतच नोंदणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यामुळे रविवारी आणि सोमवारी मुंबईसह राज्यात लसीकरण होणार नाही. अॅपबाबतचे तांत्रिक अडथळे दूर झाल्यानंतरच पुढील लसीकरणाला सुरुवात होईल, अशी अत्यंत महत्त्वाची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. व मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांनी दिली आहे. ( )

वाचा:

मुंबईत शनिवारी झालेल्या लसीकरणादरम्यान काही जणांची कोविन अॅपवरून नोंदणी झाली नाही. त्यांना दूरध्वनी करून लस घेण्यासाठी बोलावण्यात आले होते. शनिवारी ऑफलाइन नोंदणी केंद्राच्या निर्देशानुसार करण्यात आले होते, असे काकाणी यांनी स्पष्ट केले आहे. अॅपमधील अडचणी असल्याने आणि पुढे जाऊन नवीन लसी येतील तेव्हा नोंदणीत अडचणी येण्याची शक्यता असल्याने लसीकरण तूर्त दोन दिवस होणार नाही, असे डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

वाचा:

पालिकेने दिले ‘हे’ स्पष्टीकरण

‘कोविड १९ लसीकरण मोहिमेची आज अंमलबजावणी करत असताना, या मोहिमेसाठी कार्यरत असलेल्या कोविन ॲप मध्ये तांत्रिक समस्या उद्भवत असल्याचे निदर्शनास आले. ही समस्या दूर करण्याचे प्रयत्न केंद्र शासनाकडून सुरू आहेत. कोविड लसीकरण करत असताना संपूर्णपणे डिजिटल नोंदणी करणे सक्तीचे आहे. आज तांत्रिक अडचण आली असता ऑफलाइन नोंदी करण्यास परवानगी शासनाने दिली होती. तथापि, यापुढील सर्व नोंदी ॲप द्वारेच करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. ही बाब लक्षात घेता, मुंबईत रविवार दिनांक १७ जानेवारी २०२१ आणि सोमवार दिनांक १८ जानेवारी २०२१ असे दोन दिवस स्थगित ठेवण्यात आले आहे. कोविन ॲप पूर्ववत होताच लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे’, असे मुंबई पालिकेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

राज्यात नियोजित लसीकरण सत्र रद्द केलेले नाही: आरोग्य विभाग

राज्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये दि. १८ जानेवारी पर्यंत लसीकरण सत्र रद्द केल्याच्या वृत्ता संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागानेही स्पष्टीकरण दिले आहे. महाराष्ट्रात आरोग्य विभागातर्फे नियोजित असलेले कुठलेही करोना लसीकरण सत्र रद्द करण्यात आलेले नाही. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील आठवड्यामध्ये चार दिवस लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले.

वाचा:

दरम्यान, राज्यभरात आज पहिल्या दिवशी लसीकरण नियोजनबद्धरित्या पार पडले. लसीकरणासाठी मोठा उत्साह दिसून आला. मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सकाळी मुंबईत या मोहिमेचे उद्घाटन झाले. त्यानंतर निश्चित करण्यात आलेल्या केंद्रांवर सुरळीतपणे लसीकरण झाले. सीरम इन्स्टिट्युटचे अदर पुनावाला यांनीही पुण्यात आज लस टोचून घेतली व नागरिकांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here