वाचा:
मूळचा सातारा तालुक्यातील अतितचा असलेला तुषार हा नवोदय विद्यालयात अकरावी विज्ञान शाखेत शिकत होता. तो अभ्यासात अत्यंत हुशार होताच, शिवाय विविध मैदानी खेळामध्येही तो चमकला होता. त्याचा फिटनेस उत्तम होता. बास्केटबॉलमध्ये विद्यालयाच्या संघातून गोव्यात काणकोण तसेच गुजरातमध्ये जामनगरला त्याने चमकदार कामगिरी केली होती. एनडीएला जाण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यादृष्टीने तो चिकाटीने अभ्यास व सराव करत होता. त्याचे वडील गणपत कांबळे हे कराटे व मार्शल आर्टचे प्रशिक्षक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने मरून बेल्ट प्राप्त केला होता. शिवकालीन दांडपट्टा, तलवारबाजी या मर्दानी खेळातही तो पारंगत होता.
वाचा:
धावता धावता खाली कोसळला आणि…
अलीकडेच तुषारने आरसीबीच्या शिबिरात गोलंदाजीचे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर दि. १७ जानेवारी रोजी त्याला पुन्हा बोलावण्यात आले होते. परंतु तत्पूर्वीच त्याला दुर्दैव आड आले. शुक्रवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे धावण्याच्या सरावासाठी बाहेर पडला. धावता धावता त्याला धाप लागली व तो खाली कोसळला. त्यामुळे त्याला तातडीने उपचारासाठी नागठाणे येथे नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला सातारला हलवण्यास सांगितले. त्यानुसार सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात त्याला नेण्यात आले असता तिथे तिथे त्याची प्राणज्योत मालवली. तुषारच्या अशा अकस्मात एक्झिटमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य यांनी तुषारचे अंत्यदर्शन घेऊन त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. नवोदय परिवार एका हुशार व चांगल्या विद्यार्थ्याला मुकला आहे. संपूर्ण नवोदय परिवार या दु:खात सहभागी आहे, अशा शब्दात त्यांनी तुषारला श्रद्धांजली अर्पण केली.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times