नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘प्रारंभः आंतरराष्ट्रीय समिट’ला संबोधित केले. वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने ही समिट आयोजित केली होती. दोन दिवसीय कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधानांनी मल्टी-सेक्टोरल टेक्निकल अँड इकोनॉमिक कॉर्पोरेशन (बिम्सटेक) च्या बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्हच्या तरुण शोधकांशी संवाद साधला. बिम्सटेक देशांमध्ये बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड यांचा समावेश आहे.

स्टार्टअपला प्रारंभिक भांडवल देण्यासाठी पंतप्रधानांनी एक हजार कोटी रुपयांचा स्टार्टअप सीड फंड तयार करण्याची घोषणा केली. तरुणांवर लक्ष केंद्रीत करून भारत एक स्टार्टअप सिस्टम तयार करत आहे. नवीन दशकात आम्ही सर्व स्टार्टअपला एक नवीन ओळख देऊ आणि संपूर्ण जगाला बिम्सटेकच्या सामर्थ्याची जाणीव करून देऊ, असं म्हणाले.

परिवर्तनाच्या काळात प्रत्येक देशाचे स्वतःचे अनुभव असतात. भारताने ५ वर्षांच्या अनुभवाची एक पुस्तिका प्रसिद्ध केली आहे. बिम्सटेक देशही आपले अनुभव यातून सांगतील. हे आपल्या सर्वांना शिकण्यास मदत करेल. स्टार्टअप इंडिया मिशनला सुरवातीला बरीच आव्हाने होती. भारत हा जगातील आज सर्वात मोठा स्टार्टअप इको-सिस्टम आहे. १४ हजार स्टार्टअप्स कुठल्या ना कुठल्या मोहिमांमध्ये सुरू आहेत. भारतात जगातील सर्वात मोठी स्टार्टअप इको सिस्टीम आहे, असं पंतप्रधान मोदी
म्हणाले.

‘स्टार्टअपमध्ये भविष्य बदलण्याची शक्ती’

एक स्टार्टअप उपग्रह प्रक्षेपण बद्दल बोलत होता. भविष्य बदलण्याचे सामर्थ्य स्टार्टअपमध्ये आहे, याची जाणीव आपल्या बोलण्यातून दिसून येते. आधीपासूनच स्टार्टअपमध्ये असलेल्या तरुणांना पाहिल्यानंतर पहिली प्रतिक्रिया ‘अरे वा’ अशीच येईल. हा बदल बिम्सटेकची मोठी शक्ती आहे. भारत आणि बिम्सटेकमधील स्टार्टअप्समध्ये समान ऊर्जा दिसते, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here