म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
येथील वीर सावरकर मार्गावरील सुस्थितीतील स्टीलचे ग्रील काढून तेथे लोखंडी ग्रील बसवले जाणार असल्याचा दावा मनसेने केला आहे. या विषयावरून आणि मनसेत जोरदार वाद सुरू झाला आहे. जुने ग्रील उखडून काढले जात असल्याचे मनसेचे म्हणणे आहे, तर सेनेने मनसेला काही कामधंदे नसल्याने ते राईचा पर्वत करत असून जुने ग्रील बदलले जाणार नाहीत, असे प्रत्युत्तर दिले आहे.

शिवाजी पार्कमधील वीर सावरकर मार्गावर मनसेचे तत्कालीन नगरसेवक यांच्या नगरसेवक निधीतून स्टीलचे ग्रील बसवण्यात आले होते. पाच ते सहा वर्षांपूर्वी बसवण्यात आलेले हे ग्रील अजूनही मजबूत आहेत. ते काढून तेथे लोखंडी ग्रील बसवले जाणार असल्याचा दावा देशपांडे यांनी केला आहे. ‘हे ग्रील आजही बळकट आहेत. त्यांना कुठेही तडा गेलेला नाही, की ते खराब झालेले नाहीत. ग्रील पाण्याने स्वच्छ केले किंवा पॉलिश केले, तरी आणखी अनेक वर्षे ते टिकतील. असे असतानाही स्थानिक नगरसेविका विशाखा राऊत यांनी ते बदलण्याचे काम सुरू केले आहे. कंत्राटदाराचे पोट भरण्याचा हा उद्योग आहे,’ असा आरोप देशपांडे यांनी केला आहे.

याबाबत विशाखा राऊत यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ‘पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी सुशोभीकरण प्रकल्पात प्रभादेवीचे सिद्धिविनायक मंदिर ते माहीमदरम्यान फुटपाथचे सुशोभीकरण केले जाणार आहे. या प्रकल्पात केटरिंग कॉलेजच्या फुटपाथला लोखंडी ग्रील लावले जाणार आहे. केटरिंग कॉलेजच्या समोरच्या फुटपाथला, म्हणजे सूर्यवंशी हॉलपासून पुढे असलेले स्टीलचे जुने ग्रील बदलले जाणार नाहीत. हे ग्रील काही ठिकाणी वाकडे झाले आहेत, त्याचे पॉलिश उडाले आहे. त्यांची डागडुजी आणि स्वच्छता केली जाणार आहे.’ देशपांडे हे माहिती न घेता प्रत्येक गोष्टीचे राजकारण करत आहेत, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here