‘मुंबई शहरचे पालकमंत्री यांच्या मालवणी मतदारसंघात काही दिवसांपूर्वी हिंदू, दलित कुटुंबांवर घर सोडण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. आता रामजन्मभूमीचे पोस्टर फाडले गेले. मालवणीत कोणाची सत्ता आहे,’ असा सवाल भाजपचे नेते यांनी शनिवारी केला.
मालवणी मतदारसंघात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे. पोलिसांनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना अटक केली. त्यामुळे जातीय तेढ निर्माण करण्याचे वातावरण जाणीवपूर्वक निर्माण केले जात आहे, असा आरोप शेलार यांनी केला. अयोध्येत रामाचे भव्य मंदिर उभे राहणार आहे. जनतेच्या सहभागातून आणि समर्पणामतून हे मंदिर होणार आहे. या विषयाला कोणीही जातीय रंग देऊ नये. मुंबईतील मालवणीमधूनही अयोध्येतील मंदिरासाठी मोठ्या प्रमाणावर निधी जमा केला जाईल, असे ते म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times