पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत येथे प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक यांच्या गाडीला एका कारने पाठीमागून धडक दिल्यानं संतापलेल्या मांजरेकर यांनी शिवीगाळ करून चापट मारली, अशी तक्रार यांनी यवत पोलिसांकडे दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी मांजरेकर यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. ()
वाचा:
शुक्रवारी रात्री (१५ जानेवारी) साडे दहा वाजता हा प्रकार घडला. महेश मंजरेकर हे सोलापूरच्या दिशेनं चालले होते. मध्येच त्यांनी कारला अचानक ब्रेक लावला. त्यावेळी मागून येणाऱ्या कैलास सातपुते यांची ब्रिझ्झा कार मांजरेकरांच्या कारला धडकली. त्यात त्यांच्या कारचे किरकोळ नुकसान झाले. हे लक्षात येताच मांजेरकर गाडीतून उतरले आणि सातपुते यांना शिवीगाळ केली. दारू पिऊन गाडी चालवतोस का, असं म्हणत त्यांनी सातपुते यांना चापट मारली, असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. अपघातानंतर तक्रारदार व मांजरेकर यांच्यात झालेल्या वादावादीचा व्हिडिओ देखील तक्रादार व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात भादविच्या कलम ३२३, ५०४ व ५०६ अन्वये अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारदार सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील रहिवासी आहेत.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times