वॉशिंग्टन: अमेरिेकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्यावर हिंसाचाराचे सावट असताना एका व्यक्तिला पोलिसांनी बंदूक आणि ५०० काडतूसांसह अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे या व्यक्तिकडे बायडन यांच्या शपथविधी सोहळ्याची खोटी प्रवेशपत्रिकाही आढळली आहे. या घटनेमुळे अमेरिकेत एकच उडाली आहे.

आरोपीचे नाव वेस्ले ए बिलर (३१ वर्ष) असल्याचे समोर आले आहे. आरोपीने बंदूक आणि काडतूसे ट्रकमध्ये लपवली होती. अटक केल्यानंतर बिलरने आपण ही बंदूक आणि काडतूसे चुकून आणली असल्याचे सांगितले. आपण वॉशिंग्टनमध्ये एका सुरक्षा एजन्सीमध्ये काम करत आहोत. कामावर जाण्यास उशीर होत असल्यामुळे घाईगडबडीत गाडीमध्ये शस्त्र असल्याचे विसरलो, असा बचाव त्याने केला आहे. बिलर एक कंत्राटदार म्हणून काम करत असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. पार्क पोलिसांनी त्याला ओळखपत्र दिले होते. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांना त्याची ओळख पटली नाही.

तपास यंत्रणांनी सांगितले की, बिलरचा कोणत्याही अतिकट्टरवादी गटांशी जुने संबंध नाहीत. बिलरवर सध्या परवान्याशिवाय शस्त्रं बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पोलिसांच्या कागदपत्रांनुसार, बिलर रोखण्यात आले तेव्हा त्याच्याजवळ शस्त्र असल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी त्याच्याजवळून ९ एमएम हॅण्डगनची काडतूसे जप्त केली आहेत.

वाचा:

वाचा:

बायडन यांचा शपथविधी सोहळा २० जानेवारी रोजी पार पडणार आहे. या सोहळ्यावर ट्रम्प समर्थकांकडून होणाऱ्या हिंसाचाराचे सावट आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे अमेरिकेच्या संसद इमारतीत ६ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर नियोजित अध्यक्ष जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या शपथविधी दरम्यान पुन्हा एकदा हिंसाचार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावेळी ट्रम्प समर्थकांच्या हाती शस्त्रदेखील असण्याचा इशारा एफबीआयने दिला आहे. कॅपिटल हिलमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान काही पाइप बॉम्बही आढळून आले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here