ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज () याने १९९७ साली मेलबर्न क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध हॅटट्रिक घेतली होती. स्टुअर्टची ही अखेरची वनडे मॅच होती. त्याने करिअरमध्ये फक्त ३ वनडे मॅच खेळल्या आणि त्यात ८ विकेट घेतल्या. पण अखेरच्या या लढतीत हॅटट्रिक घेऊन सुद्धा पुढे कधीच त्याला संघात संधी मिळाली नाही.
पाकिस्तानविरुद्ध स्टुअर्टने १० षटकात २६ धावा देत पाच विकेट घेतल्या. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. स्टुअर्टच्या या शानदार कामगिरीनंतर देखील ऑस्ट्रेलिया संघात त्याला पुन्हा संधी मिळाली नाही. त्याने पाकिस्तानच्या एजाज अहमद, मोहम्मद वसीम, मोइन खान यांना बाद करत हॅटट्रिक पूर्ण केली होती.
स्टुअर्टने प्रथम श्रेणीच्या २६ सामन्यात ७० विकेट घेतल्या होत्या. ७६ धावात ७ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. तर लिस्ट एच्या २७ सामन्यात ४५ विकेट घेतल्या होत्या. लिस्ट एमध्ये २६ धावात ५ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times