वॉशिंग्टन: मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स हे अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी झाले आहेत. बिल गेट्स यांनी अमेरिेकेतील १८ राज्यांमधील दोन लाख ४२ हजार एकर जमीन खरेदी केली आहे. यातील बहुतांशी जमीन ही शेती करण्यास योग्य आहे.

जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत असणारे बिल गेट्स हे सर्वाधि शेतजमिन असणारे अमेरिकन व्यक्ती ठरले आहेत. बिल गेट्स या जमिनीवर शेती करण्यासह स्मार्ट सिटी उभारणार असल्याची चर्चा आहे. बिल गेट्स यांच्याकडे आता जवळपास दोन लाख ६८ हजार ९८४ एकरणदजमिनीची मालकी आहे. बिल गेट्स यांनी ही जमीन थेट वैयक्तिक गुंतवणूक घटक असलेल्या कास्केड इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून खरेदी केली. बिल गेट्स यांनी वर्ष २०१८ मध्येही वॉशिंग्टनमध्ये १६ हजार एकर जमीन खरेदी केली होती. यात हॉर्स हेवन हिल्स क्षेत्रच्या १४ हजार ५०० एकर जमिनीचाही समावेश होता. याची किंमत १२५१ कोटी रुपये होती.

वाचा:

वाचा:

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एरिजोनामध्ये बिल गेट्स यांनी स्मार्ट सिटीच्या प्रकल्पासाठी जमिन खरेदी केली आहे. स्मार्ट सिटी तयार करण्याची गेट्स यांची महत्त्वकांक्षा असल्याचे बोलले जाते. बिल अॅण्ड मेलिंडा फाउंडेशनने २००८ मध्ये कृषी क्षेत्रात काम करण्याबाबतची घोषणा केली होती. आफ्रिका आणि जगातील इतर गरीब आणि विकसनशील देशांतील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात मदत करणार असल्याची घोषणा त्यावेळी करण्यात आली. त्यासाठीच्या निधीचीही घोषणा त्यांनी केली होती. गरीब आणि विकसनशील देशांमधील अन्नधान्य उत्पादन वाढवण्यासाठी त्यांनी ही घोषणा केली होती.

वाचा:

६५ वर्षीय बिल गेट्स यांनी अमेरिकेतील लुसियानामध्ये ६९ हजार एकर. एरिजोनामध्ये २५ हजार एकर शेतजमिन खरेदी केली आहे. बिल गेट्स यांनी कृषी क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केल्यास अमेरिकेतील कृषी क्षेत्राला फायदा होऊ शकतो, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here