बीजिंग: चक्क आइस्क्रीमलाही करोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. यामुळे चीनमध्ये खळबळ उडाली आहे. चीनमधील तियानजिनमध्ये एका ठिकाणी भागात तयार करण्यात आलेल्या आइस्क्रीम मध्ये करोनाचे विषाणू आढळले. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. सध्या ही आइस्क्रीम खाणाऱ्या लोकांचा शोध सुरू असून त्यांची चाचणी करण्यात येत आहे.

‘चायना डेली’ने दिलेल्या वृत्तानुसार, Tianjin Daqiaodao या फूड कंपनीच्या ४८३६ बॉक्सना करोना विषाणूचा संसर्ग झाला. यापैकी २०८९ बॉक्स स्टोरेजमध्ये आहेत. तर उर्वरीत जवळपास १८०० बॉक्स इतर राज्यांमध्ये वितरीत करण्यात आले आहे. तर, ९३५ आइस्क्रीम बॉक्स स्थानिक बाजारात विक्रीसाठी दाखल झाले होते. यातील ६५ आइस्क्रीम बॉक्सची विक्री करण्यात आली.

वाचा:

अधिकाऱ्यांनी तीन पॅकेटची चाचणी केली असताना त्यांना करोनाचे विषाणू आढळून आले. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून Tianjin Daqiaodao सर्व उत्पादनांना सील करण्यात आले आहे. आइस्क्रीम तयार करण्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल न्यूझीलंड आणि युक्रेनमधून मागवण्यात आले असल्याचे समोर आले आहे.

वाचा:

आइस्क्रीममध्ये करोनाचा विषाणू आढळल्यानंतर कंपनीतील सर्वच १६६२ कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले. त्यांची तातडीने करोना चाचणी करण्यात आली. त्यातील ७०० जणांची चाचणी निगेटीव्ह आली असून इतरांच्या चाचणीचा निकाल आला नाही.

वाचा:
तज्ज्ञ काय म्हणतात?

लीड्स विद्यापीठाचे वायरोलॉजिस्ट डॉ. स्टीफन ग्रीफिन यांनी सांगितले की, कारखान्यात स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे अथवा एखाद्या करोनाबाधित व्यक्तिमुळे आइस्क्रीम ला झाला असू शकतो. आइस्क्रीम ला अतिशय कमी तापमानात ठेवले जाते. त्यामुळे विषाणू अधिक वेळेपर्यंत जिवंत राहू शकतो. लोकांनी या प्रकाराला घाबरण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here