अहमदनगर: काल करोनावरील लस घेतल्यानंतर नगरमध्ये तीन परिचरिकांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थीर असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या दोन व महापालिका रुग्णालयाच्या एका परिचारिकेचा यात समावेश आहे. काल दुपारी लस घेतल्यानंतर त्यांना त्रास सुरू झाला. थंडी, ताप, डोकेदुखी, थकवा, मळमळ, उलट्या, चक्कर येणे असे त्रास होऊ लागला. त्यामळे त्यांना रात्रीच जिल्हा रुग्णलयात दाखल करण्यात आले. अशा रुग्णांसाठी तेथे १२ खाटांचा खास कक्ष सुरू करण्यात आला आहे. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. आज लसीकरण बंद असून यापुढे एक दिवसाआड लस देण्यात येणार आहे.

वाचा:

जिल्ह्यात १२ केंद्रावर लसीकरण करण्यात आले. पहिल्या दिवशी १२०० जणांना लस देण्यात येणार होती. प्रत्यक्षात ८७१ जणांनी उपस्थित राहून लस टोचून घेतली. लसीकरणानंतर संबंधितांना अर्धा तास केंद्रावर ठेवल्यानंतर घरी सोडण्यात आले. लस घेतलेल्यांपैकी दोघींना रात्री तर एकीला सकाळी त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात आणण्यात आले. लस घेतलेल्या अन्य कर्मचाऱ्यांवरही लक्ष ठेवण्यात येत आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here