वॉशिंग्टन: करोनाच्या संसर्गाचे थैमान सुरूच असून बाधितांची आणि मृतांची संख्या वाढत आहे. जगभरात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वीस लाखांच्या पुढे गेली आहे. तसेच करोनाबाधित रुग्णांची संख्या नऊ कोटी ४० लाखांवर पोहोचली आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार,जगातील करोनाबाधितांची संख्या नऊ कोटी ४० लाखांहून अधिक झाली असून करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वीस लाख २२ हजार झाली आहे.

करोनामुळे अमेरिकेला सर्वाधिक फटका बसला असून, अमेरिकेतील रुग्णसंख्या दोन कोटी ३७ लाख ५४ हजार ३७१२ इतकी झाली आहे, तर मृतांची संख्या तीन लाख ९५ हजार ७८५ इतकी आहे. त्यानंतर भारत आणि ब्राझीलमध्ये करोनाबाधितांची संख्या मोठी आहे. भारतात करोनाबाधितांची संख्या दीड कोटींवर गेली असून, ब्राझीलमध्ये रुग्णसंख्या ८३ लाखांवर गेली आहे. ब्राझीलमध्ये मृतांची संख्या दोन लाख नऊ हजार २९६ इतकी आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक करोनामृत्यू झाले आहेत. दरम्यान, रशियामध्ये ६० टक्के लोकसंख्येला लसीकरण पूर्ण झाले आहे.

वाचा:
वाचा: दहा कोटी नागरिकांना लसीकरणाचे उद्दिष्ट

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ सुरू झाल्यानंतर पहिल्या शंभर दिवसांत दहा कोटी नागरिकांचे लसीकरण करण्येच उद्दिष्ट ठेवले आहे. देशात लसीकरणाची सुरुवात अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली. बायडेन २० जानेवारीला अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी सहकाऱ्यांशी देशातील आरोग्य व्यवस्थेबाबत चर्चा केली.

वाचा:

वाचा:
गुटेरस यांची टीका

जागतिक समन्वय असलेल्या प्रयत्नांच्या अभावी साथीचा मोठा फटका बसला आहे. याशिवाय सरकारांचा ‘व्हॅसिनॅशनलिझम’ आत्मघाती असून, त्यामुळे करोनाच्या जागतिक उच्चाटनासाठी विलंब होणार असल्याची टीका संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी केली. डिसेंबर २०१९मध्ये आढळलेल्या करोना विषाणूचा फैलाव जगभरात झाला आहे. करोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या २० लाखांवर गेली असून, साथीचा सामाजिक आणि आर्थिक परिणाम मोठा झाला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून, लाखो लोक गरिबीत लोटले गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुटेरस यांनी टीका केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here