ब्रिस्बेन: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात विकेट न गमावता २१ धावा केल्या. यजमान संघाकडे ५४ धावांची आघाडी झाली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ गाजवला तो भारताच्या आणि यांनी, या दोघांनी वैयक्तीक अर्धशतक पूर्ण केली आणि सातव्या विकेटसाठी १२३ धावांची भागिदारी करून ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना रडवले.

वाचा-

तिसऱ्या दिवशी भारताने चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या फलंदाजासह डावाची सुरूवात केली. या जोडीने संघाचे शतक पूर्ण केले. त्यानंतर पुजारा २५ धावाकरून बाद झाला. त्या पाठोपाठ अजिंक्य रहाणे ३८ धावांवर माघारी परतला. भारताचे कसोटी फलंदाज बाद झाल्यानंतर मयांक अग्रवाल आणि ऋषभ पंत यांनी धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. पण त्याच ऑस्ट्रेलियाने मयांकला ३८ वर तर पंतला २३वर बाद करून भारताची अवस्था ६ बाद १८६ केली. भारत अध्याप १८३ धावांनी पिछाडीवर होता आणि मैदानात पदार्पण करणारा वॉशिंग्टन सुंदर आणि फक्त एका कसोटीचा अनुभव असलेल्या शार्दुर ठाकूर फलंदाजी करत होते. पण सुंदर आणि ठाकूर या जोडीने त्यानंतर जे काही केले त्याने इतिहास घडवला.

वाचा-

सुंदर आणि ठाकूर यांनी सातव्या विकेटसाठी १२३ धावांची भागिदारी केली. ठाकूर आणि सुंदर यांनी कसोटीतील पहिले अर्धशतक झळकावले. सुंदरचे पदार्पणातील अर्धशतक ठरले. ठाकूरने ११५ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ६२ तर सुंदरने ११५ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह ६७ धावा केल्या. भारताचा पहिला डाव ३३६ धावांवर संपुष्ठात आला.

वाचा-

ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात जोश हेजलवडूने सर्वाधिक ५ विकेट घेतल्या. यजमान ऑस्ट्रलियाला पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याची संधी होती. पण भारताच्या तळातील फलंदाजांनी शानदार फलंदाजीकरत ऑस्ट्रेलियाला फक्त ३३ धावांच्या आघाडीवर समाधान मानावे लावले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here