आईचं छत्र हरपलेल्या दोन लहान मुलांवर त्यांच्या पित्याकडून अनन्वित अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यात घडला आहे. विशेष म्हणजे हा अत्याचारी बाप रेल्वे पोलिसामध्ये कार्यरत आहे. राहुल विजय मोरे असं त्याचं नाव आहे.
वाचा:
जन्मदात्या बापाचा अत्याचार सहन करणाऱ्या या मुलांच्या आईचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला. दुर्दैवानं या मुलांना जीव लावणाऱ्या आजीवरही काळानं घाला घातला. त्यामुळं त्या लहान बाळाकडं लक्ष देण्यासाठी कोणीच नव्हतं. मुलांची जबाबदारी खांद्यांवर पडलेल्या बापानं दुसरं लग्न केलं. त्यानंतर दिवसेंदिवस मुलांचे हाल वाढत गेले. पोलीस बापाकडून मुलांना जबर मारहाण सुरू झाली. आज या नराधम बापानं हद्द केली. मुलांना काठीनं व हातानं जबर मारहाण केली.
वाचा:
घटनेची माहिती मिळाल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी मुलांना सिव्हिल हॉस्पिटल उपचारासाठी दाखल केलं आहे. मुलांना प्रचंड मारहाण झाली असून, ते घाबरले असल्याचं जवळच्या नातेवाईकानी सांगितलं. या प्रकरणी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times