कुणाल लोंढे,पनवेल

पनवेल, उरण तालुक्यात जमिनीला कोट्यवधींच्या भाव आल्यामुळे इथला स्थानिक समाज आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहे. वडिलांची जमीन गेल्यानंतर भाऊ कोट्यधीश झाले. मात्र, लग्न होऊन सासरी गेलेल्या बहिणीची परिस्थिती ‘जैसे थे’ राहिली. बहिणीने मालमत्तेत हिस्सा मागितला की भावाबहिणींचे वाद होतात. उरणच्या न्यायालयात अशा प्रकारचे अनेक खटले सुरू आहेत. रक्षाबंधन, भाऊबीज तर सोडाच पण भाऊ आणि बहीण एकमेकांसमोरही येत नसल्याची असंख्य उदाहरणे परिसरात आहेत. रायगड जिल्ह्यातील काँग्रेस नेते यांनी अशा भावाबहिणींसमोर नवा आदर्श घालून दिला आहे.

लंडन येथील कॉव्हेन्ट्री युनिव्हर्सिटीत उच्च शिक्षण घेतलेल्या त्यांची मुलगी सोनालीचा विवाह १९ डिसेंबरला राजस्थान येथील उमेद पॅलेस येथे पार पडला. मोठ्या दिमाखात झालेल्या लग्नाची चर्चा सर्वत्र होती. लग्नानंतर सोनाली पाचपरतावण्यासाठी २६ डिसेंबरला घरी आल्यानंतर घरत कुटुंबीयांनी तिला सुखद धक्का दिला. चार सदस्य असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांच्या मालमत्तेतील चौथ्या हिश्शाचे दानपत्र तिच्या हातात देऊन आमच्यासाठी मुलगा आणि मुलगी समान असल्याचा संदेश त्यांनी दिला. पत्नी शुभांगी आणि मुलगा कुणाल आणि मी चर्चा केल्यानंतर सर्वांच्या सहमतीने आम्ही हा निर्णय घेतल्याचे महेंद्र घरत यांनी सांगितले. मालमत्तेच्या वादामुळे भाऊबहीण एकमेकांपासून दूर जात असल्याचे वाद आमच्या भागात प्रचंड आहेत. आमच्या शेलघर गावाला लागून असलेल्या बामणडोंगरी, मोरावे, कोपर, शिवाजीनगर आदी गावांमध्ये अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्यामुळे हा िनर्णय घेतल्याचे घरत म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here