सामनातील एका लेखात शिवसेना खासदार यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. हाच धागा पकडत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. संभाजीनगरचा राज्याच्या अस्मितेचा विषय येताच काँग्रेसला कोपरापासून साष्टांग दंडवत, सत्तेसाठी एवढी लाचारी?, असं ट्विट शेलार यांनी केलं आहे.
औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर व्हावे यासाठी जनभावना स्पष्ट असतानाच सामनाची भाषा बदललेली दिसतेय. स्वतःच्या नेत्याचा अहंकार असेल तर भाषा असते उखाड दिया. पण राज्याच्या अस्मितेचा विषय असेल तेव्हा भाषा बदलते ती कोपऱ्यापासून दंडवत घालतो. आज कोपऱ्यापासून दंडवत घालतो म्हणणारे उखाड दियाची भाषा का करत नाहीत?, असा सवाल शेलार यांनी केला आहे. शिवाय, का केवळ सत्तेसाठी इतकी लाचारी? कुठे फेडाल ही पापं?, असंही त्यांनी म्हटलं आहे.
संजय राऊतांनी लेखात काय म्हटलंय?
‘औरंगजेब हा धर्मांध आक्रमक होता. तो ‘सेक्युलर’ अजिबात नव्हता. बाबरानं जे अयोध्येत केलं तेच औरंगजेब महाराष्ट्रात करीत होता. औरंगजेबाचा सरळ संबंध छत्रपती संभाजीराजांच्या वधाशी जोडला गेला आहे. असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं सेक्युलर नव्हे, असं राऊतांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times