मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक लवकरच विवाह बंधनात अडकणार असून तिच्या घरी लगीन घाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मानसीच्या घरी ग्रहमख पूजाही केली गेली. या विधीपासूनच तिच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मानसीचा साखरपुडा पार पडला होता.सोशल मीडियावर फोटो शेअर करत मानसीनं तिच्या चाहत्यांसोबत ही खास गोष्ट शेअर केली होती. मानसीच्या चाहत्यांना आता तिच्या लग्नाचे वेध लागले आहे.

सोशल मीडियावर प्रेमाची कबुलीकाही महिन्यांपूर्वी मानसीनं आंतरराष्ट्रीय बॉक्सर प्रदीप खरेरा याच्यासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचं सांगितलं होतं. तेव्हापासूनच या दोघांच्या लग्नाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. मानसीचा होणारा पती प्रदीप खरेरा हा बॉक्सर तर आहेच, शिवाय तो मॉडेल आणि अभिनेताही आहे. त्यानं अनेक नावाजलेल्या स्पर्धा जिंकल्या आहेत. एवढंच नाही तर मध्ये मिस्टर इंडिया युनायटेड कॉन्टिनेट्स २०१८ चा तो विजेता आहे. मानसी नाईकप्रमाणेच प्रदीप खरेराही सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो आपले व्यायामाचे आणि मॉडेलिंगचे अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here