लोकप्रिय ठरलेल्या या अॅपचं पुढचं व्हर्जन म्हणून Byte अॅपकडे पाहिलं जातं. Byte अॅपवर यूजर्स ६ सेकंदाचा व्हिडिओ पोस्ट करू शकतात. टिकटॉक सारखाच हा अॅप असला तरी Byte कंपनी लवकरच रेव्हेन्यू शेअरिंगची सुविधा देणार आहे. त्यामुळे यूजर्सला फायदाच होणार आहे. Byteवर व्हिडिओ टाकणाऱ्यांना कंपनीकडून पैसे दिले जाणार आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर स्टार होतानाच पैसे कमावण्याची संधीही यूजर्सना मिळणार आहे.
हा अॅप संपूर्णत: नवीन असून कुटुंबासाठीही आहे. टिकटॉकप्रमाणेच हा अॅप व्हिडिओ बेस्ड आहे, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. Vine अॅपचे सहसंस्थापक डॉम हॉफमॅन यांनी एक टीजर जारी केला होता. त्यात त्यांनी Vine अॅपच्या सिक्वलवर काम करत असल्याचं म्हटलं होतं. असं असलं तरी Byte ही स्वतंत्र कंपनी असून हा अॅप गुगल प्लेस्टोअर आणि अॅपल प्लेस्टोअरवरून डाऊनलोड करता येणार आहे. सध्या हा अॅप ४० देशांमध्ये उपलब्ध आहे. मात्र भारतात हा अॅप अजून आला नाही. भारतात टिकटॉक प्रचंड लोकप्रिय असल्याने टिकटॉकला टक्कर देण्यासाठी नव्या फिचरसह हा अॅप लॉन्च करण्याचं कंपनीने ठरवलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात टिकटॉकलाही Byteला टक्कर देण्यासाठी कात टाकावी लागेल, असं सूत्रांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times