सामनातील एका लेखात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. औरंगजेबाचा सरळ संबंध छत्रपती संभाजीराजांच्या वधाशी जोडला गेला आहे. असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं सेक्युलर नव्हे, अशी टीका संजय राऊतांनी केली होती. संजय राऊतांच्या या टीकेवर यशोमती ठाकूर यांनी काँग्रेसला सेक्युलरीजम शिकवण्याची गरज नाही, अशा शब्दात शिवसेनेला ठणकावलं आहे.
वाचाः
यशोमत ठाकूर यांनी एक ट्विट केलं आहे. तसंच, या ट्विटमध्ये संजय राऊत आणि शिवसेनेला टॅग केलं आहे. ‘आम्ही काँग्रेस म्हणून महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात असलेल्या विषयांवर काम करण्यास कटिबद्ध आहोत. काँग्रेसला सेक्युलरीजम शिकवण्याची गरज नाही. आपली मतं वैयक्तिक आहेत की पक्ष म्हणून याचा खुलासा झाल्यावर बोलता येईल,’ असं ठाकूर यांनी म्हटलं आहे.
बाळासाहेब थोरात यांनी पत्रात काय म्हटलंय?
औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडविला जात आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणार्यांची संख्या वाढत चालली आहे, मात्र मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत, हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही? असा सवाल थोरातांनी उपस्थित केला आहे.
वाचाः
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times