वाचा:
मोठ्या प्रतीक्षेनंतर करोनावरील लस आली आहे. पहिल्या टप्प्यातील सुरू झाले आहे. त्याबद्दल अण्णा हजारे यांनी समाधान व्यक्त केले. आता आमच्या देशातील करोनाचा नायनाट व्हावा, अशी इश्वराकडे प्रार्थना करतो, असेही ते म्हणाले. लोकांना लस घेण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यावेळी तुम्ही लस घेणार का, असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी विचारला असता हजारे म्हणाले, ‘होय घेणार. का नाही घ्यावी? वैयक्तिक मला मरणाची भीती वाटत नाही. मात्र, समाजाचे मुख्य म्हणून पुढे चालणारी जी माणसे आहेत, त्यांनी पहिला डोस घेतला पाहिजे. आधी वाट पहात बसायचे आणि लस आल्यावर ती इतरांना घेऊ द्यायची आणि यशस्वी झाल्यावर आपण घ्यायची याला काही अर्थ नाही.’
वाचा:
‘गेल्या आठ-नऊ महिन्यांत करोनाने आपल्या देशात धुमाकूळ घातला. अनेकांना प्राण गमवावे लागले. आज जे सुरू झाले ते महत्त्वाचे आहे. लसीमुळे लोकांच्या मनात संसर्गाची भीती राहणार नाही. जगातील अनेक देशांत करोनामुळे जास्त बळी गेले. त्या मानाने भारतात बळींची संख्या कमी आहे. ही ईश्वराचीच कृपा म्हणावी लागेल. आता लसीकरण सुरू झाले. टप्प्याटप्प्याने ती सर्वांना मिळेल. लसीकरणाचे परिणाम दोन महिन्यांत दिसतील. या लसीमुळे आपल्याला करोनाचा नायनाट करता येईल. आरोग्य कर्मचाऱ्यांना होणारे लसीकरण महत्त्वाचे आहे. त्यांच्यामुळे संसर्ग टाळण्यास मदत होईल. सरकारचा हा विचार महत्त्वाचा आहे. मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की या लसीला यश मिळावे व आमच्या देशातील करोना नाहीसा व्हावा’, असेही अण्णांनी पुढे नमूद केले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times