नवी दिल्ली: सरदार वल्लभभाई पटेल यांचा उंच पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ ( ) पाहण्यासाठी आता गुजरातमधील केवडिया गावी जाणं सोपं होणार आहे. दिल्लीहून केवडियाला आता थेट ट्रेन धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( ) यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून स्टॅच्यू ऑफ युनिटी, केवडिया ( kevadia ) यांना देशाच्या विविध भागात जोडणार्‍या ८ गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. तसेच पंतप्रधानांनी गुजरातमधील विविध रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटनही केलं.

देशाच्या कानाकोपऱ्यातून एकाच ठिकाणासाठी अनेक रेल्वे गाड्यांना एकावेळी हिरवा झेंडा दाखवण्यात आला. रेल्वेच्या इतिहासात प्रथमच असं घडतंय. केवडियाचे स्थान आहेही तेवढे मोठे आहे. कारण त्याची ओळख सरदार पटेल यांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याने झाली. आहे. ज्यांनी एक भारत, श्रेष्ठ भारत हा मंत्र दिला. केवडिया रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे आदिवासी बांधवांचेही जीवन बदलणार आहे, असं म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी दाभोई-चांचोड गेज रूपांतरण, चांचोड-केवडिया गेज रूपांतरण नवनिर्मित प्रतापनगर-केवडिया विभाग विद्युतीकरणाच्या माध्यमातून तसेच दाभोई, चंचोड आणि केवडिया स्थानकांच्या नवीन इमारतींचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केलं.

एमजी रामचंद्रन यांची आठवण

पंतप्रधान मोदींनी तामिळनाडूचे दिवंगत माजी मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना स्मरण करत श्रद्धांजली वाहिली. आम्ही एमजीआरचे आदर्श पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आज केवडियाकडे जाणाऱ्या गाड्यांपैकी एक गाडी पुरैच्ची तलैवर डॉ. एम.जी. रामचंद्रन मध्य रेल्वे स्थानकातूनही रवाना होत आहे. योगायोगाने आज भारतरत्न एम.जी. रामचंद्रन यांची जयंती आहे, असं मोदी म्हणाले.

अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

गुजरातमधील रेल्वे संबंधित प्रकल्पांच्या उद्घाटनास गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल उपस्थित होते. यासह अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेही उपस्थिती लावली. या रेल्वे स्थानकांमध्ये स्थानिक वैशिष्ट्ये आणि आधुनिक प्रवासी सुविधा देण्यात आल्या आहेत. केवडियाला हे देशातील पहिले स्टेशन आहे ज्याला हरित इमारतीचे प्रमाणपत्र मिळाले आहे.

या ठिकाणांहून गाड्या सुटणार

या आठ गाड्या केवडियाला वाराणसी, दादर, अहमदाबाद, हजरत निजामुद्दीन, रीवा, चेन्नई आणि प्रतापनगरला जोडतील. या योजनेमुळे भारतीय रेल्वेच्या नकाशावर जगातील सर्वात मोठी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला स्थान मिळेल. तसेच केवडिया हे रेल्वे मार्गाने जोडले गेल्याने पर्यटक कोणत्याही अडचणीशिवाय देशभरातून इथं पोहोचू शकतील.

स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहणे सोपं होईल

रेल्वे गाड्यांमुळे दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील अन्य शहरांतील नागरिक स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देणं सोपं होईल. केवडियाला आतापर्यंत एकही थेट ट्रेन नव्हती. पर्यटकांना बडोद्याला उतरून रस्त्याने जावं लागायचं. प्रवाशांना इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड वेबसाइट किंवा मोबाइल अ‍ॅपवरून यासाठी तिकिट बुक करता येईल.

या स्थानकांवरून ट्रेन सुटेल

वाराणसी, दादर, दिल्ली, अहमदाबाद, रीवा आणि चेन्नई स्थानकांवरून केवडियासाठी एक्सप्रेस गाड्या रवाना होतील. अहमदाबाद-केवडिया जन शताब्दी ट्रेनमध्ये व्हिस्टाडोम कोच देखील असेल. पर्यटनाला चालना देण्यासाठी ट्रेनचा प्रवास सुंदर आणि संस्मरणीय बनवण्याचा या मागचा उद्देश आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here