वाच:
शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढणार का?, हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत होता. यावर शिवसेना नेते व प्रवक्ते यांनी आज अधिकृतरित्या घोषणा केली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुका लढण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख यांनी घेतला आहे, असे संजय राऊत यांनी ट्वीटरच्या माध्यमातून स्पष्ट केले.
वाचा:
राऊत यांनी आपल्या खास शैलीत पश्चिम बंगालसाठी रणशिंग फुंकले आहे. ‘बहुप्रतीक्षित अपडेट्स घेऊन मी आलो आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेत पश्चिम बंगालच्या निवडणुका लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. आम्ही लवकरच कोलकाता येथे दाखल होत आहोत. जय हिंद, जय बांगला!’ असं राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे. ‘जय बांगला’ ही घोषणा राऊत यांनी बंगाली भाषेत नमूद केली असून शिवसेना पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढेल, असेच संकेत याद्वारे मिळाले आहेत.
दरम्यान, येत्या ३० मे रोजी पश्चिम बंगालमधील विद्यमान सरकारचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे आतापासूनच तिथे निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. एकीकडे निवडणूक आयोगाने पू्र्वतयारी सुरू केली असताना राजकीय पक्षांनीही कंबर कसायला सुरुवात केली आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपने आपली सारी ताकद पणाला लावली आहे. केंद्रीय गृहमंत्री , भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा हे सातत्याने पश्चिम बंगालचा दौरा करत आहेत. ममता यांच्या पक्षाला सुरुंग लावण्याचे कामही या दोन नेत्यांनी केले आहे. या संघर्षात आता शिवसेनेची एंट्री झाल्याने सामना अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे. शिवसेनेची तिथे फारशी ताकद नसली तरी भाजपला डॅमेज करण्यासाठी काही जागांवर ममतांचा पक्ष शिवसेनेला मदत करू शकतो, असे बोलले जात आहे. उद्धव ठाकरे हे सातत्याने भाजपला आव्हान देत आहेत. त्यात अनेकदा ममतांनी उद्धव यांच्या भूमिकेचे कौतुक व स्वागत केलेले आहे. या मैत्रीचे दर्शनही पश्चिम बंगालात घडेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times