मुंबईः आज राज्यात ३ हजार ०८१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ५० जणांना करोनामुळं प्राण गमवावा लागला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात करोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीत सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. गेले काही दिवस करोना बाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती. मात्र, आज करोनाचे हे आकडे पुन्हा फिरले आहेत. आज करोना बाधित रुग्णांचा आकडा पुन्हा वाढला आहे. गेल्या २४ तासांत ३ हजार ०८१ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं राज्यात एकूण करोना रुग्णांची संख्या २० लाखांच्या जवळपास येऊन ठेपली आहे. सध्या राज्यात १९ लाख ९० हजार ७५९ इतकी झाली आहे. तर, ५२ हजार ६५३ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.

आज दिवसभरात २ हजार ३४२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळं आतापर्यंत १८,८६,४६९ करोना बाधित रुग्णांनी करोनावरील लढाई यशस्वीरित्या जिंकली आहे. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर म्हणजेच रिकव्हरी रेट ९४. ७६ टक्के इतका झाला आहे. गेल्या २४ तासांत ५० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून राज्यात आत्तापर्यंत करोनामुळं प्राण गमावलेल्या एकूण रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ७३८ इतकी झाली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३८,०६,३८७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,९०,७५९ (१४.४२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२५,३०८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,०४५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here