मुंबईः सोशल मीडियावरुन होणारे गुन्हे, ऑनलाइन खरेदीमध्ये फसवणूक या गुन्ह्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे समोर आलं आहे. मुंबईतील एका ३२ वर्षीय तरुणानं ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून तब्बल २२ हजार लोकांना गंडा घातल्याची घटना घडली आहे.
बनावट शॉपिंग साइटच्या माध्यमातून या तरुणानं २२ हजार जणांकडून ७० लाख रुपये उकळले आहेत. विशेष म्हणजे फसवणूक झालेल्यांमध्ये सर्वाधिक समावेश हा महिलांचा होता. बनावट शॉपिंग साइटच्या माध्यमातून महिलांचे कपडे, खोटे दागिने, घरगुती वस्तूंची विक्री करण्यात येत होती. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली असून त्याने आणखी किती जणांना फसवलं आहे याचा सखोल तपास करण्यात येत आहे.
दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सायबर गुन्हे दुप्पट झाले आहेत. गंभीर गुन्ह्यांपेक्षा सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दुप्पटीपेक्षा जास्त असल्याच्या दिसून आले. यंदा ऑनलाइन बँकिंग फ्रॉडमध्ये खूप मोठी वाढ झाली असल्याचे दिसत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times