वाचा:
प्रकल्पाची पालकमंत्री सामंत यांनी रविवारी पाहणी केली. त्यानंतर अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन त्यांच्याकडून आढावा घेतला व आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार , आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे आदी उपस्थित होते.
सामंत म्हणाले की, आज सिंधुदुर्ग विमानतळाची पाहणी केली असून अद्याप तारीख निश्चित झाली नसली तरी येत्या आठ ते दहा दिवसात मुंबईहून विमान सिंधुदुर्ग चिपी विमानतळावर उतरेल आणि सिंधुदुर्ग वरून मुंबईला जाईल. आता ज्या तारखा दिल्या जात आहेत त्या तारखा निश्चित नाहीत. तांत्रिक बाबी पूर्ण करूनच विमानसेवा सुरू होईल. विमानतळाकडे येणारे रस्ते, परिसर सुशोभीकरण, केंद्राची सिक्युरिटी नसल्याने पोलीस अधिकारी किती लागतील? कॉन्स्टेबल किती लागतील?, सशस्त्र पोलीस किती?, सुरक्षा बोर्डाचे सुरक्षा रक्षक किती पाहिजेत? याच्यावर आजच्या आढावा बैठकीत चर्चा झाली. विमान उड्डाण आणि लँडिंगसाठी जी यंत्रणा लागेल ती सर्व यंत्रणा सज्ज आहे. केंद्राकडून आवश्यक ती परवानगी मिळाली की विमान सेवा सुरू होईल. चिपी विमानतळ उद्घाटनासाठी २३ तारीख ठरल्याचा जो कागद दाखवला जात आहे, तो कागद पालकमंत्री म्हणून मी, खासदार विनायक राऊत, किंवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून अंतिम झालेला नाही.
वाचा:
केंद्र शासनाच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने चिपी विमानतळाबाबत चांगल्या प्रकारे सहकार्य केले आहे. दिल्लीच्या पथकाने चिपी विमानतळाची पाहणी केल्याचा अहवाल सोमवारी संध्याकाळपर्यंत दिल्लीला जाईल आणि काही सूचना असतील तर त्या पूर्ण करून दिल्या जातील. या प्रकल्पाला केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य आहे. चिपी विमानतळ प्रकल्प सुरू करणे हा सांघिक विषय असल्यामुळे यात कुठलेही राजकारण नाही असेही सामंत यांनी पुढे स्पष्ट केले.
यावेळी खासदार राऊत म्हणाले की, केंद्राच्या उडान योजनेत हा प्रकल्प असल्याने केवळ २ हजार ५०० रुपयांत प्रवाशांना मुबंईचा प्रवास करता येईल. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी आणि मुख्यमंत्री यांचा या विमानसेवेबाबत संपर्क सुरू आहे. केंद्राकडून आवश्यक ते सर्व सहकार्य मिळत आहे. पायाभूत सुविधांमध्ये वीज, रस्ता, पाणी, टेलिफोन आदिंची पूर्तता करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व यंत्रणा सज्ज झाल्यानंतरच विमान सेवा सुरू होईल. पाट ते पिंगुळी रस्त्याचे बजेट तयार करण्याचे आदेश पालकमंत्री सामंत यांनी बैठकीत दिले आहेत. विमानतळाच्या प्रवेशद्वारातून खालच्या प्रवेशद्वारापर्यंत रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे त्यासाठी ४० कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. पायाभूत सुविधा संपूर्णत: राज्य सरकारने पुरविल्या आहेत. ७ कोटी रुपये किमतीच्या दोन फायर ब्रिग्रेडच्या गाड्याही आल्या आहेत.
निमंत्रण पत्रिका आली कुठून?
चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख अद्याप ठरलेली नाही, तरीही ३० जानेवारीपूर्वी विमानसेवा सुरू होणार आहे. आज सोशल मीडियावर व्हायरल झालेली निमंत्रण पत्रिका नेमकी कोणाकडून आली, याबाबत आपल्यालाच कल्पना नाही. तारीख अजून ठरायची आहे. आपण व खासदार या निमंत्रण पत्रिका आणि तारखेबद्दल अनभिज्ञ आहोत, असा दावाही पालकमंत्री उदय सामंत यांनी केला.
वाचा:
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times