लखनऊः अयोध्येत ३९ महिन्यांत प्रभू श्रीरामचे भव्य मंदिर बांधून पूर्ण होईल. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे आतापर्यंत अयोध्येतील मंदिर बांधण्यासाठी १०० कोटी रुपयांची देणगी जमा करण्या आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही ट्रस्टला ५ लाख १०० रुपयांची देणगी दिली आहे. ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांनी १५ जानेवारीवा स्वत:ला राष्ट्रपतींची भेट घेतली होती.

राम मंदिर निर्मणासाठी राष्ट्रपतींकडून देणगी घेतल्यावरून माध्यमांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राष्ट्रपतींच्या देणगीवरून टीका करणाऱ्यांना ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी उत्तर दिलं. आक्षेप आणि टीका करणाऱ्यांनी आधी इतिहास वाचावा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

‘विरोधानंतरही राजेंद्र प्रसाद यांची सोमनाथ मंदिराला भेट’
जे लोक राष्ट्रपतींनी दिलेल्या देणगीवर आक्षेप घेत आहेत त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, की देशाच्या पंतप्रधानांचा विरोध असूनही राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी गेले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे भारतीय आहेत आणि भारताच्या आत्म्यात राम आहे. जे कोणी सक्षम असतील ते या उदात्त कार्यात मदत करू शकतील. यात काहीही चुकीचं नाही, असं ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले.

‘३९ महिन्यांत राम मंदिर बांधलं जाणार’

देशातील पाच मोठ्या अभियांत्रिकी संस्था, इमारतींचे बांधकाम आणि भू-गर्भ संबंधित संस्थांच्या शास्त्रज्ञांनी मंदिराच्या पाया आणि जमिनीखाली स्थितीचा अभ्यास केला आहे. यामुळे पायाभरणीचे काम सुरू झाले. ३९ महिन्यांत मंदिर बांधले जाईल, असा पुनरुच्चार चंपत राय यांनी केला.

‘आतापर्यंत १०० कोटींची देणगी’

राम मंदिर निर्माणासाठी किती देणगी मिळाली? याची अद्यापपर्यंत अचूक माहिती मिळालेली नाही. पण कार्यकर्त्यांनी अंदाजानुसार आतापर्यंत १०० कोटी रुपयांचे दान मिळाल्याचं बोललं जात आहे. यासाठी १५ जानेवारीपासून विश्व हिंदू परिषद जनसंपर्क अभियान राबवत आहे. ही मोहीम २७ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे, असं चंपत राय यांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here