करोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे जिल्हा निवडणूक आराखडे तयार करण्यात आले होते. १८ जानेवारीपासून या संस्थांच्या निवडणुकांच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाणार होती. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने याबाबतचे आदेश दिले होते. मात्र, राज्य सरकारने पुन्हा स्थगिती दिली आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्य सरकारने वेळोवेळी सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे. ३१ डिसेंबर २०२० रोजी ही मुदत संपली होती.
दरम्यान, सहकारी संस्थांनी मासिक सभा या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा अन्य डिजिटल पर्यायांचा वापर करून घेण्याचा; तसेच निवडणुका होईपर्यंत विद्यमान संचालक मंडळ कार्यरत ठेवण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळांकडून संबंधित सहकारी संस्थांचे कामकाज सुरू राहणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times