गावगाड्याचा कारभारी ठरवण्यासाठी १६ जानेवारी रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. सत्ताधारी व भारतीय जनता पक्षामध्ये कोण सरस ठरणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निकालाचे लाइव्ह अपडेट्स…
लाइव्ह अपडेट्स:
>> अहमदनगर: मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी करण्यास आणि विजयी मिरवणूक काढण्यास बंदी
>> थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात
>> राज्याच्या ग्रामीण भागावर वर्चस्व कोणाचे? सत्ताधारी महाविकास आघाडी की भाजप? आज ठरणार
>> १५२३ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक
>> राज्याच्या ३४ जिल्ह्यांतील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींसाठी १६ जानेवारी रोजी झाले होते मतदान
>> राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times