अहमदनगर: ‘आदर्शगाव हिवरे बाजारमध्ये तब्बल ३० वर्षांनी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. ज्या हातांनी गाव उभे केले, तेच हात यापुढेही गाव सांभाळण्यासाठी सक्षम आहेत, यावर ग्रामस्थांनी शिक्कामोर्तब केले आहे. पुढील पन्नास वर्षांच्या विकासाची पायाभरणी या निवडणुकीतून झाली आहे,’ अशी प्रतिक्रिया हिवरे बाजारचे प्रवर्तक यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ शी बोलताना व्यक्त केली. (‘s reaction on Gram Panchayat Result)

हिवरे बाजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा आज निकाल लागला. यामध्ये पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखालील आदर्श ग्राम विकास पॅनलचे उमेदवार पोपटराव पवार, विमल ठाणगे, विठ्ठल ठाणगे, मीना गुंजाळ, सुरेखा पादिर, रोहिदास पादिर, रंजना पवार हे सर्व विजयी झाले. किशोर संबळे यांच्या परिवर्तन ग्रामविकास पॅनलचा धुव्वा उडाला. विरोधी उमेदवारांना अतिशय कमी मते मिळाली असून त्या सर्वांचे डिपॉझिट जप्त होणार असल्याचे सांगण्यात आले.

९० च्या दशकात पवार यांच्या पुढाकारातून ग्रामपरिवर्तनाची सुरवात झाली. विविध उपक्रम राबवत गावाने आदर्शगाव आणि विकासाकडे झेप घेतली. यातील प्रमुख सूत्र होते ते निवडणूक बिनविरोध करण्याची. निवडणुकीच्या राजकारणामुळे एकोपा राहत नाही, त्यामुळे ग्रामसभेत निर्णय घेऊन निवडणूक बिनविरोध केली जात होती. गावाने राजकीय पक्षांनाही थारा दिलेला नाही. आतापर्यंत ही पद्धत चालत आली. यावेळी मात्र, पवार यांच्यावर एकाधिकारशाहीचा आरोप करून गावातील काही विरोधकांनी बंड पुकारले. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीची पंरपरा मोडली गेली. मात्र, तरीही सयंमाने प्रचार करण्याचे ठरवून गावाने शांतता भंग होऊ दिला नाही. अखेर विरोधकांची डाळ शिजली नाही.

वाचा:

निकालानंतर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले, ‘हिवरे बाजारकडे आम्ही केवळ एक गाव म्हणून पहात नाही. अन्य गावांना दिशा देणारे ते केंद्र आहे. त्यामुळे येथे निवडणूक घेण्याची वेळ आली तरीही आम्ही ती आदर्श पध्दतीनेच करून दाखविली. ग्रामस्थांनी विकासाच्या बाजूने कौल दिला आहे. ज्या हातांनी गाव उभे केले, तेच हात याही पुढे गाव चालविण्यास सक्षम आहेत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आता राज्यातील अन्य आदर्श गावांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. या निवडणुकीत पुढील पन्नास वर्षांच्या विकासाची पायाभरणी झाली आहे. आमच्या गावात निवडणूक झाली, तेही बरेच झाले. त्यातूनही विकासकामांबद्दल कोणाच्या शंका नाहीत, आरोप नाहीत, हे पुढे आले. केवळ एकाधिकारशाही आणि दडपशाही केल्याचे आरोपच विरोधक लावू शकले. अर्थात त्यांच्या या आरोपांनाही गावकऱ्यांनी मतपेटीतून उत्तर दिले आहे. यापुढे हिवरे बाजार देशातील अन्य गावांपुढे आदर्श ठेवण्याचे काम सातत्याने करत राहणार आहे.’

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here