कल्याण शहरातील रस्त्याची दुर्दशा झाली असून इतके वाईट रस्ते अख्या महाराष्ट्रात नसतील, अशा शब्दांत कल्याणात क्रिक्रेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आलेले गृहनिर्माण मंत्री यांनी पालिका प्रशासनासह सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली. तीन वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवली शहराचा ‘देशातील सर्वात घाणेरडे शहर’ असा उल्लेख करत केंद्रीय दळणवळण मंत्री यांनी ताशेरे ओढले होते. यानंतर आता रस्त्यावरून केडीएमसीला पुन्हा एकदा राज्यातील महत्त्वाच्या मंत्र्याने लक्ष केले आहे. मात्र हा निवडणुकीच्या निमित्ताने केलेला स्टंट असल्याचा आरोप होत आहे.
वाचा:
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात राज्य सरकारच्या निधीतून काँक्रीटच्या रस्त्याची कामे सुरू आहेत. मात्र तरीही अनेक रस्ते उखडले असून खड्डे, धूळ यामुळे नागरिक, वाहनचालक बेजार झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याची तक्रार आहे. त्यातच शहरातील मुख्य महामार्गासह गल्लीबोळातील रस्ते विविध कारणांसाठी खोदले जात असून काम संपल्यानंतर ते पूर्ववत केले जात नाहीत. तक्रार केल्यास, हा रस्ता विकासकांनी महापालिकेकडे हस्तांतरित केला नसल्याचे सांगत प्रशासनाकडून हात झटकले जातात.
वाचा:
रविवारी कल्याणात आलेले मंत्री आव्हाड यांनी रस्त्याच्या दुर्दशेकडे बोट दाखवत सत्ताधारी शिवसेनेवर वार केला. कल्याणात मागील २५ वर्षे शिवसेनेची सत्ता असतानाही शहरात विकासकामांचा बोजवारा उडाल्याकडे त्यांनी निर्देश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उमेश बोरगावकर यांना चांगला रस्ता शोधून दाखवा अशी स्पर्धा भरविण्याचा सल्ला देत आव्हाड यांनी पालिका प्रशासनाला कानपिचक्या दिल्या. विशेष म्हणजे, व्यासपीठावर शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर उपस्थित असतानाच आव्हाड यांनी शिवसेनेला हा टोला हाणला. आव्हाड यांचे भाष्य ही वस्तुस्थिती असून निवडणुकीच्या तोंडावर यांना शहरातले प्रश्न दिसू लागल्याचा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केला.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times