औरंगाबादः गेल्या २५ वर्षांपासून पाटोदा गावात सरपंच म्हणून बाजी मारणारे भास्कररावर पेरे पाटील यांच्या संपूर्ण पॅनलला मात्र यंदाच्या निवडणूकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. राज्यात पाटोद्याला आदर्श गाव म्हणून ओळख मिळवून देणारे यांच्या कन्या अनुराधा पेरे यांचाही पराभव झाला आहे.

पाटोदा ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा आज निकाल लागला. यामध्ये भास्करराव पेरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाटोद्यात पॅनल उभे केले. भास्करराव पेरे पाटील यांच्या कन्या अनुराधा पेरे पाटील या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. अनुराधा पाटील यांना १८६ मतं मिळाली आहे तर, त्यांच्या विरोधात उभे असलेले दुर्गेश खोकड यांनी २०४ मतं मिळवून विजय मिळवला आहे. भास्करराव पाटील यांच्या पॅनलचा पराभव हा धक्कादायक मानला जात आहे.

भास्करराव पेरे पाटील हे गेली २५ वर्ष पाटोदा ग्रामपंचायतीत सरपंच म्हणून कार्यरत आहे. या काळात पाटोदा गावाचा कायापालट करुन राज्यात आदर्श गाव म्हणून ओळख मिळवून दिली होती. मात्र, यंदा त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांच्या कन्या अनुराधा या निवडणुकीत उतरल्या होत्या. मात्र, येथे भास्करराव पेरे यांचं संपूर्ण पॅनलच पराभूत झाले आहे.

पाटोदा गावातील ११ जागांपैकी ८ उमेदवार बिनविरोध निवडणून आले होते. तर, बाकीच्या तीन जागांसाठी निवडणूक झाली होती. मात्र, या तिन्ही जागांवर भास्कर पेरे यांच्या पॅनलचा पराभव झाला असून संपूर्ण ११ जागांवर कपिंद्र पेरे पाटील यांच्या पॅनलनं सत्ता मिळवली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here