अहमदनगर: जामखेड तालुक्यातील महत्त्वाच्या ग्रामपंचायतींवर आमदार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता काबीज केली आहे. भाजपचे माजी मंत्री प्रा. यांना हा मोठा धक्का आहे. शिंदे यांचे मूळ गाव असलेल्या चौंडी ग्रामपंचायतीवरही राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. लवकरच कर्जत आणि जामखेड येथील नगरपालिकांच्या निवडणुका होत असून त्यामध्येही असेच चित्र राहील का, अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. ()

विधानसभा निवडणुकीत शिंदे यांचा पराभव करून विजयी झालेल्या पवार यांनी विविध माध्यमांतून मतदारसंघावर आपली पकड मजबूत ठेवण्याचा सतत प्रयत्न केला आहे. त्याचे परिणाम आता ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून लागले आहेत. चौंडी हे राम शिंदे यांचे मूळ गाव आहे. अहिल्यादेवी होळकर यांच ते वंशज आहेत. याच गावाच्या जोरावर त्यांना राज्यात मंत्रिपदापर्यंत संधी मिळत गेली. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीपासून चित्र बदलत गेले. मतदारसंघातील पराभवानंतर शिंदे यांची आता गावावरील पकडही सुटल्याचे यातून दिसून येते. आमदार रोहित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून सुरू केलेला जनसंपर्क त्यांच्या कामाला येत असल्याचे दिसून येते. विधानसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर भाजपचे पराभूत उमेदवार राम शिंदे यांना भेटण्यासाठी पवार चौंडीतील शिंदे यांच्या घरी गेले होते. त्यांची ही कृती त्यावेळी लोकांची मने जिंकणारी ठरली होती.

वाचा:

जामखेड तालुक्यातील खर्डा ही सर्वांत मोठी ग्रामपंचायत आहे. तेथेही राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळविला. खर्डा येथे पवार यांनी चांगला जनसंपर्क ठेवत किल्ला आणि इतर विकासाच्या योजना दिल्या. ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी शिंदे व पवार यांच्यात आरोप प्रत्यारोप रंगले होते. बिनविरोध निवडणुकीसाठी पवार यांनी निधी देण्याची योजना जाहीर केल्यावर शिंदे यांनी हरकत घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मतदारसंघात कोणाची दडपशाही, दादागिरी सुरू आहे, त्यावरूनही आरोपप्रात्यारोप रंगले होते. या दरम्यान १२ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली होती. आता उरलेल्यापैंकी महत्वाच्या ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात जात आहेत.

वाचा:

ग्रामपंचायत निवडणुकीत खर्डा, चौंडी साकत, सह बहुतांशी गावात राष्ट्रवादी काँग्रेस ने बाजी मारली आहे. खर्डा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकुण १७ जागांपैकी ११ जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आल्याने भाजप च्या बालेकिल्याला मोठा धक्का बसला आहे. चौंडी ग्रामपंचायतीत शिंदे यांचा पॅनल पराभूत झाला असून तेथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृ्त्वाखालील पॅनलला ९ पैकी ७ जागा मिळाल्या आहेत. राम शिंदे यांचे पुतणे अक्षय शिंदे व बंधू अविनाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने मोट बांधली होती. साकतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ७ जागा तर भाजपला ४ जागा मिळाल्या आहेत. पिंपरखेड हसनाबाद ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीनेच बाजी मारली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here