ब्रिस्बेन, : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आजचा चौथा दिवस चांगलाच गाजवला. सिराजने ऑस्ट्रेलियाच्या पाच फलंदाजांना बाद करत त्यांचे कंबरडेच मोडले. सिराजच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर सिराजवर भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागने खास टिप्पणी केल्याचे पाहायला मिळाले आहे. सेहवागचे ट्विट यावेळी चांगलेच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सिरजाच्या विक्रमी कामगिरीनंतर सेहवागने एक ट्विट केले आहे. यामध्ये सेहवागने म्हटले आहे की, ” काही दिवसांपूर्वी लहान (अनुनभवी) वाटणारा मोहम्मद सिराज आता मोठा (अनुभवी) वाटायला लागला आहे. पहिल्याच कसोटी मालिकेत तो भारतीय वेगवान गोलंदाजीचा लीडर बनला आहे. या कसोटी मालिकेत पदार्पण करणाऱ्या भारतीय खेळाडूंनी देदिप्यमान कामगिरी केली असून ती अविस्मरणीत अशीच आहे, बराच काळ ही कामगिरी नक्कीच लक्षात राहील.”

सिराजने चौथ्या दिवशी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ गारद केला आणि त्यांचे कंबरडे मोडले. सिराजच्या भेदक माऱ्यामुळेच ऑस्ट्रेलियाला यावेळी तिनशे धावांचा पल्लाही गाठता आला नाही. सिराजने यावेळी स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन आणि मॅथ्यू वेड या तिघांना बाद करत ऑस्ट्रेलियाची मधळी फळी खिळखिळी करून टाकली. त्याचबरोबर अन्य दोन फलंदजांना बाद करत सिराजने पहिल्यांदाच कसोटी मालिकेत पाच विकेट्स मिळवण्याचा पराक्रम केला आहे. सिराजने यावेळी भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथचा २० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढल्याचेही पाहायला मिळाले आहे. सिराजने आतापर्यंत यया मालिकेत १३ बळी मिळवण्याची किमया साधली आहे. यापूर्वी हा विक्रम श्रीनाथच्या नावावर होता. श्रीनाथने १९९१ साली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात आपल्या नावावर १० विकेट्स मिळले होते.

सामना संपल्यावर कर्णधार अजिंक्य रहाणेने यावेळी सिराजला प्रथम पॅव्हेलियनमध्ये जाण्याचा मान दिला. त्यावेळी भारतीय खेळाडू सिराजचे कौतुक करत होते. पण यावेळी भारताचा अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराने सिराजचे फक्त कौतुकच केले नाही, तर बुमराने यावेळी सिराजला मिठी मारत त्याला शाबासकीही दिली. या गोष्टीचा व्हिडीओ सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वामध्ये चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहल्यावर चाहते सिराजबरोबरच बुमराचेही कौतुक करत असल्याचे पाहाला मिळत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here