नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आनंद देणारे आहेत. राज्य पातळीवर झालेली तिन्ही पक्षांची आघाडी तळागाळातील जनतेनं स्वीकारली आहे असा याचा अर्थ आहे. या निकालावरून मी विरोधकांवर टीका करणार नाही. त्यांनी निकालाचा अभ्यास करावा. मनचिंतन, मतचिंतन काय हवे ते करावे,’ अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.
औरंगाबाद नामांतरावर भुजबळ म्हणाले…
औरंगाबादच्या नामांतराचा वाद सध्या गाजतो आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना व काँग्रेस या सत्ताधारी पक्षांमध्येच यावरून कलगीतुरा सुरू आहे. त्यावरही भुजबळ यांनी आपलं मत मांडलं. ‘सरकार अडचणीत येईल एवढा हा वाद ताणला जाऊ नये. जनतेचं हित डोळ्यासमोर ठेवून काम करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत हे दोन्ही पक्षांनी लक्षात ठेवावं,’ असा सल्ला भुजबळ यांनी शिवसेना व काँग्रेसला दिला.
यापुढील निवडणुकांमध्ये आणखी मोठं यश मिळेल: अनिल देशमुख
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. ‘राज्यातील सर्वच जिल्ह्यांत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी विजय मिळवलाय. तिन्ही पक्षातील समन्वयाचं हे यश आहे. मधल्या काळात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालामुळं महाराष्ट्रासह देशभरात एक संदेश गेला होता. तोच संदेश या निकालानं दिला आहे. महाविकास आघाडीला पुढील काळातही असंच यश मिळेल आणि पाच काय, त्यापुढचीही वर्षे ही आघाडी राज्य करेल. विरोधकांची स्वप्नं ही स्वप्नंच राहतील,’ असं ते म्हणाले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times