‘ग्रामपंचायतीत कोणताही झेंडा किंवा चिन्ह घेऊन लढत नसतो, तिथं कार्यकर्ते असतात. काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या विचाराचे कार्यकर्ते एकत्र आले आणि चांगली ताकद लावली. त्यातूनच हा विजय झाला आहे. पुढील काही दिवसांत एक नंबर कोण व दुसऱ्या क्रमांकावर कोण या गोष्टी कळतील. पण काम करताना सर्वांना सोबत आणि विचारात घेऊनच काम करावं लागेल,’ अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे.
‘काही ठराविक लोकांकडे अनेक वर्ष सत्ता आहे मात्र, तरीही विकास झाला नाही तिथं लोकांनीच बदल केलेला दिसत आहे. लोकांना विकासकामं पाहिजेत फक्त शब्द नको. ग्रामपंचायतींमध्ये कदाचित आमच्या विचारांचे सदस्य नसतील पण लोकं, मतदार आमचीच आहेत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न असेल,’ असंही रोहित पवारांनी नमूद केलं आहे.
दरम्यान, जामखेड तालुक्यातील खर्डा ही सर्वांत मोठी ग्रामपंचायत आहे. तेथेही राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळविला. खर्डा येथे पवार यांनी चांगला जनसंपर्क ठेवत किल्ला आणि इतर विकासाच्या योजना दिल्या. तसंच, राम शिंदे यांचं मुळ गाव असलेल्या चौंडी ग्रामपंचायतीवरही राष्ट्रवादीची सत्ता आली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times