माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघात एकूण ७३ ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत्या, त्या पैकी ४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तर वडगाव ब्रुद्रूक ग्रामपंचायतीने निवडणूकीवर बहिष्कार टाकला होता. उर्वरीत ६८ ग्रामपंचायतीत निवडणूकीसाठी मतदान घेण्यात आले होते. जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत यशासाठी भाजप विरूध्द राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेनेने कंबर कसली होती. या निवडणूकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष होते.
गिरीश महाजन यांच्या वर्चस्वाची कसोटी होती. मात्र त्यात गिरीश महाजन यशस्वी झाले आहेत. तालुक्यातल ६८ ग्रामपंचायतींपैकी भारतीय जनता पक्षाने तब्बल ४५ जागांवर विजय विजय मिळविला आहे. उर्वरीत जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, व शिवसेनेने विजय मिळविला आहे.
जामनेर तालुका भाजपाचा बालकिल्ला
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुका हा भाजपाचा बालेकील्ला असल्याचे सिध्द झाले आहे. एकूण निकालापैकी ९० ते ९५ टक्के ग्रामपंचातींवर भाजपाने विजय मिळवला आहे. समोर तीन पक्ष असतांना देखील तालुक्यातील सर्व महत्वाच्या व लहान मोठ्या ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व राहीले असल्याची प्रतिक्रीया माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी दिली आहे. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपालाच कौल मिळाल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times