गृहमंत्री देशमुख पत्रकारांशी बोलत होते. अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउंसिलचे (BARC) माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांचे व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाले असून त्याबाबत आम्ही संपूर्ण माहिती घेतल्याचे देखमुख म्हणाले. या चॅटमध्ये अनेक संवेदनशील गोष्टींचा उल्लेख करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
संयुक्त संसदीय समिती गठीत करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि टेलिव्हीजन रेटिंग एजन्सी बीएआरसीचे माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांच्यातील कथित चर्चेच्या तपासासाठी संयुक्त संसदीय समितीची (JPC) निर्मिती करावी अशी मागणी या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोमवारी सरकारकडे केली आहे. अर्बण गोस्वामी यांना बालाकोट हवाई हल्ल्याबाबत अनेक प्रकारच्या गुप्त माहिती मिळालेल्या होत्या असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख प्रवक्ते महेश तपासे यांनी कथित व्हायरल चर्चेचा संदर्भ घेत म्हटले होते.
क्लिक करा आणि वाचा-
‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडेही मागणार स्पष्टीकरण’
राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांचा वापर टीआरपी वाढवण्यासाठी गेला गेला ही गोष्ट चिंता वाढवणारी असल्याचे तपासे यांनी म्हटले आहे. या प्रकरणी आपण राज्याचे गृहमंत्री यांची भेट घेत या प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून स्पष्टीकरण मागणार असल्याचेही तपासे म्हणाले. अर्णब यांना इतक्या संवेदनशील गोष्टींची कशी माहिती झाली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. गृह मंत्रालयाने याच्या सूत्रांचा तत्काळ तपास करून तत्काळ कारवाई देखील केली पाहिजे, असेही तपासे यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times