नांदेडमधील तालुकानिहाय ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल पाहायचे झाल्यास भोकरमध्ये एकूण ६३ ग्रामपंचायची आहेत. यांपैकी ५० ग्रामपंचायतींवर काँग्रेसने वर्चस्व ठेवले आहे. येथे काँग्रेसने १३ ग्रामपंचायती गमावल्या आहेत. तर मुदखेडमधील एकूण ४५ ग्रामपंचायतींपैकी ३७ ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत. तसेच अर्धापूरमधील ४३ ग्रामपंचायतींपैकी ३७ ग्रामपंचायती काँग्रेसकडे आहेत. येथे काँग्रेसने ६ ग्रामपंचायची काँग्रेसच्या हातून निसटल्या आहेत. म्हणजेच भोकरमधील एकूण १५१ ग्रामपंचायतींपैकी १२४ ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात आहेत. म्हणजेच भोकरमधील २७ ग्रामपंचायती काँग्रेसला जिंकता आलेल्या नाहीत.
अशोक चव्हाण यांनी सर्वात मोठी ग्रामपंचायत गमावली
भोकर मतदारसंघातील सर्वात मोठी ग्रमापंचायत असलेल्या बारडमध्ये मात्र शिवसेनेचे १७ पैकी १६ सदस्य विजयी झाले आहेत. नांदेडमधील सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी बारडची ओळख आहे. या ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेने काँग्रेसपुढे मोठे आव्हान उभे केले होते. अखेर शिवसेनेने बारडमध्ये बाजी मारत एकूण १७ सदस्य संख्या असलेल्या बारड ग्रामपंचायतीच्या १६ जागा पटकावल्या आहेत. मोठ्या ग्रामपंचायतीत शिवसेनेने एकहाती विजय मिळवत अशोक चव्हाण यांना धक्का दिल्याचे बारडमध्ये बोलले जात आहे.
क्लिक करा आणि वाचा-
तालुकानिहाय निकाल:
भोकर ५०/६३
मुदखेड ३७/४५
अर्धापूर ३७/४३
एकूण १२४/१५१
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times