कोलकाताः पश्चिम बंगालच्या राजकारणात सोमवारचा दिवस हाय व्होल्टेज होता. बंगालच्या राजकारणातील दोन दिग्गजांनी एकमेकांच्या गडात मोर्चे आणि रोड शो आयोजित करून एकमेकांना आव्हान दिलं. मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ( ) यांनी नुकत्याच दाखल झालेल्या भाजप नेते ( ) यांचा बालेकिल्ला असलेल्या नंदीग्राममध्ये जाहीर सभा घेतली. तसंच विधानसभा निवडणूक नंदीग्राममधून लढवण्याची मोठी घोषणा केली. दुसरीकडे, दक्षिण कोलकातामधील ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्यात सोमवारी भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी रोड शो घेत हुंकार भरला. त्यांनी थेट ममता बॅनर्डजींना आव्हान दिलं. नंदीग्राममधून ममता बॅनर्जींना ५० हजाराहून अधिक मतांनी पराभूत करेन अन्यथा राजकारण सोडेल, असं सुवेंदू अधिकारी म्हणाले.

ममता बॅनर्जींना नंदीग्रामची आठवण फक्त निवडणुकांच्या वेळीच होते. पाच वर्षांनंतर त्यांनी आज नंदीग्राम सभा घेतली. नंदीग्रामसाठी ममतांनी काय केलं? नंदीग्राममुळे ममता बॅनर्जी २०११ मध्ये सत्तेत आल्या. पण त्याच नंदीग्राममध्ये आंदोलनादरम्यान शेतकर्‍यांवर गोळीबार करणारे पोलिस अधिकारी अरुण गुप्ता यांना राज्य सरकारने चार वेळा मुदतवाढ दिली. नंदीग्रामची जनता ममता बॅनर्जींना कधीही माफ करणार नाही. दुसरीकडे सुवेंदूच्या यांच्या रोड शो दरम्यान दगडफेकही करण्यात आली. तृणमूल कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केल्याचा आरोप आहे. यानंतर तृणमूल कॉंग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झडप झाली. या घटनेत अनेक भाजप कार्यकर्ते जखमी झाले.

विशेष म्हणजे, सुरक्षा व बुलेट प्रूफ वाहने केंद्राकडून मिळालेली असूनही भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी सुरक्षेवरून चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी बुधवारी कोलकाता हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. जाहीर सभांवेळी राज्य सरकारने सुरक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी कोर्टाकडे केली आहे.

काही दिवसांपूर्वी नंदीग्राममधील सुवेंदू अधिकारी यांच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली होती. तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केल्याचा आरोप आहे. मात्र, यासाठी तृणमूलने भाजपला जबाबदार धरले. राज्य सरकारने जाहीर सभांदरम्यान आपल्याला पुरेसे पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी सुवेंदू अधिकारी यांनी हायकोर्टात केली आहे. सुरक्षेबाबत सुवेंदू अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यपालांची भेट घेत सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. पश्चिम बंगालमध्ये झेड-कॅटेगरी सुरक्षा असलेल्या भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here