मुंबई: ‘राज्याचे मुख्यमंत्री () हे खूप चांगली चालवतात हे मी पाहिले आहे, पण ज्या वेळेला ती ते चालवत असतात त्या वेळेला सगळा थांबलेला असतो. ट्रॅफिक चालू असतो तेव्हा ती कार स्मूथली चाललेली असते. असं सरकार चालवता येत नाहीत. सरकार ट्रॅफीक सुरूच राहतो. त्यामुळे त्यासंदर्भात जनता योग्य उत्तर देते आहे’, अशा शब्दात विरोधी पक्षनेते () यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

सध्या मी कार आणि सरकार दोन्ही चालवतो आहे. मध्ये-मध्ये खड्डे आणि अडचणी येत आहेत, पण त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होते. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

माझ्या हाती राज्याचं स्टेअरिंग भक्कम आहे, मध्ये-मध्ये खड्डे आणि अडचणी येत आहेत, पण त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही, असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ३२ व्या राज्य रस्ता सुरक्षा महिन्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केले आहे. राज्यातील अपघातग्रस्त जागा, वळणांच्या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करण्यात यावी असे निर्देश यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले.

क्लिक करा आणि वाचा-

‘पुढे कोण बसले, मागे कोण बसले हे महत्वाचे नाही’

उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘सध्या मी कार आणि सरकार दोन्ही चालवत आहे. मध्ये-मध्ये खड्डे आणि अडचणी येत आहेत, पण त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही, माझ्या हाती स्टेअरिंग भक्कम आहे. माझ्या हाती राज्याचं स्टेअरिंग भक्कम आहे. कार आणि सरकार दोन्ही व्यवस्थित सुरु आहे. पुढे कोण बसले आहे आणि मागे कोण बसलं आहे हे महत्वाचे नाही. कार आणि सरकार दोन्ही सुरळीत सुरु आहे. सर्वजण मिळून काम करत आहोत.’

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here